परवाना रद्द न झाल्यास समाज क्रांती आघाडी आंदोलन करण्याचा इशारा.
उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- पडसो बढे येथील रामकृष्ण लाळे यांच्या कडे केसरी रंगाचे राशन कार्ड आहे. पडसो बढे येथील राशन दुकानदार दिनेश सुधाम ठाकरे यांचे दुकानामधून त्यांना स्वस्त धान्य मिळत असते. स्वस्त धान्याच्या दुकानात प्रदिप चंदु गांवडे काम करतात प्रदिप गावंडे हे नेहमी अर्धा पाउन तास दुकान उघडतात व बंद करतात. पडसो बढे येथील बहुतांश लोकांना राशन मिळत नाही.
गावातील नागरिक येथील दुकानावर राशन आणण्याकरिता गेले असता, राशन संपले तुम्ही उशिरा आले असे सांगुन नागरिकांना परत पाठविले जाते. राशन दुकान मालक दिनेश सुदाम ठाकरे हे असुन राशन दुकानाचा सर्व कारभार दुकानात काम करणारा व्यक्ति प्रदिप गावंडे पाहतो. राशन घ्यायला गेलेल्या नागरिकांना उध्दटपणे बोलतो.
रामकृष्ण लाळे यांनी त्यांना प्रदिप चंदु गावंडे यांना मागील कोठ्याचे व तसेच चालू कोट्याचे राशन मागीतले असता लाळे यांना गावंडे यांनी राशन देण्यास नकार दिला. व तुम्हच्याने जे होईल ते करुन घ्या, असे म्हणाले. त्यात राशन दुकानाला स्वस्त धान्याचे दुकान अशी पाटी सुध्दा नाही. बहुतांश वेळा ही दुकान बंदच राहते म्हणून दुकानाची दररोजची उघडण्याची व बंद करण्याची वेळ निश्चीत करावी, व ग्राहकांना राशन का देव्यात येत नाही. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी. जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांनी अद्याप पर्यंत काहीच कारवाई केली नाही. पडसो बढे या गावातील राशन लाभार्थी यांना राशन पासून वंचित ठेवणाऱ्या राशन दुकानाचा परवाना रद्द करावा. अन्यथा समाज क्रांती आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी समाज क्रांती आघाडीचे तालुका संघटक संजय इंगळे तथा रामकृष्ण लाळे यांनी जिल्हाधीकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

