पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- संपत्ती साठी कोण कोणत्या स्तराला जाऊ शकते हे आज सांगता येत नाही. संपत्ती मुळे रक्ताच्या नात्यात रक्तपात घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. अशीच एक खळबळजनक घटना नागपूर येथील समोर आली आहे. येथे एका सुनेने 300 कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी आपल्या सासऱ्याच्या खुनाची सुपारी दिली आणि त्याला संपवलं. आपल्याच ड्रायव्हरला एक कोटी रुपये देऊन तिने सासऱ्याचा काटा काढल्याची घटना नागपूरमध्ये घडलीय. वरवर अपघात दिसणाऱ्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हा गु्न्हा उघडकीस आला. पुरुषोत्तम पुट्टेवार, वय 82 वर्ष, राहणार नागपूर असं मृत सासऱ्याचं नाव आहे.
22 मे रोजी मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार हे आपल्या घराबाहेर पडले. हातात एक पिशवी घेऊन ते नागपूरच्या बालाजी नगर परिसरात रस्त्याच्या कडेनं चालत होते. तेवढ्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. एक भरधाव कार पुरुषोत्तम पुट्टेवार यांनी चिरडून निघून गेली. कारच्या जोरदार धडकेत पुरुषोत्तम यांचा मृत्यू होतो. अगोदर ही घटना हिट अँड रन प्रकरण वाटू लागले. मात्र पोलिसांना एक संशय आला आणि मर्डर मिस्ट्रीचा कट उघड झाला.
मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगी, एक मुलगा आणि सून आहे. मुलगा मनिष पुट्टेवार पेशानं डॉक्टर आहेत. सून सरकारी नोकरी वर आहे. कन्या योगिताचं लग्न झालंय. पुरुषोत्तम यांनी वडिलोपार्जित तब्बल 300 कोटींची प्रॉपर्टी आहे. सासऱ्याच्या मृत्यू नंतर ही संपत्ती आपल्याला मिळेल म्हणून सुनेने हा षडयंत्र रचले आणि आपल्याच सासऱ्याची हत्या केली.
अगोदर पुरुषोत्तम यांचा मृत्यू हा अपघातात झाला असं अनेकांना वाटलं. मात्र त्यांच्या चुलत भावाला संशय आला. लागलीच त्यांनी वरिष्ठ पोलिसांची भेट घेतली आणि तिथूनच या प्रकरणाला नवी दिशा आली. यावेळी पोलिसांनी प्रथम त्यांच्याच घरातील दोन कार चालकांना ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली असता दोघं बोलते झाले. नीरज आणि सचिन अशी या कार चालकांची नावं. सचिनने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसानी पोलिसी खाक्या दाखविल्यावर हा कट कसा रचला, कुणाच्या सांगण्यावरून रचला हे सर्व सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी पुरुषोत्तम यांच्या सुनबाई अर्चनाला लगेच ताब्यात घेतलं. पुरुषोत्तम यांच्या मृत्यूचा सगळा कट हा अर्चनाने रचला होता. कशासाठी तर सासऱ्यांच्या वडिलोपर्जित 300 कोटींच्या प्रॉप्रटीसाठी.
यावेळी आरोपी सुनेने घरातील 2 चालकांना तिने तब्बल 1 कोटींचं प्रलोभन दिलं. एवढी मोटी रक्कम ऐकून दोघांचे डोळे फिरले आणि दोघांनी मिळून आपल्याच मालकाचा काटा काढला.
कशामुळे घडली ही घटना: पुरुषोत्तम पुट्टेवार हे आपली सगळी प्रॉपर्टी लेक योगिता आणि तिच्या मुलांच्या नावे करणार असल्याची कुणकुण अर्चनाला लागली. त्यानंतर अर्चनाच्या डोक्याचा पारा चढला. 300 कोटींच्या प्रॉपर्टीतून आपल्याला दमडही मिळणार नसल्याचं लक्षात येताच तिचा तिळपापड झाला. म्हणून अर्चनाने दोन कार चालकांना हाताशी घेऊन सासऱ्यांचा जीव घेतला .अर्चनाला आता सासऱ्याचे पैसे मिळो न मिळो, तुरुंगाची हवा मात्र नक्की मिळणार आहे.