जळगाव जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हा तून संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हा त एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव जिल्हातील जामनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. येथे एका 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या चिमुकलीला खाऊचं अमिष दाखवून शेतात नेण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मात्र घडला प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून या नराधमाने तिची हत्या केली.
काय आहे हे प्रकरण: अवघ्या 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. या 6 वर्षांच्या चिमुकलीला तुला खाऊ देतो आणि खेळायला मोबाईल देतो, असं म्हणत नराधमाने चिमुकलीला आपल्यासोबत घेतलं. फोन आणि खाऊचं आमिष दाखवून आरोपी अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन गेला. त्यानंतर एका शेतात त्याने तिच्यावर अत्याचार केला. मग ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून या चिमुकल्या जीवाची हत्या केली. त्यानंतर नराधम आरोपी घटना स्थळावरून पळून गेला.
पोलीस काय म्हणाले: जळगावमधल्या या घटनेवर जामनेर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध अपहरणाचा कलम तसेच खुनाच्या कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अटकेसाठी तब्बल दहा पथक जवळपासच्या जंगलासह विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. ही पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे.

