उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभवानंतर आज काँग्रेस पक्षातील पहिली विकेट पडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेत्यात धडकी भरली आहे. त्यात पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्यांवर प्रदेश स्तरावरून कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. त्यात प्रदेश सचिव व सदन कास्तकार असलेल्या प्रशांत विश्वासराव गावंडे यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.
अकोला लोकसभा मतदासंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना महायुतीतील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या कडून ४० हजार ६२६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासाठी काँग्रेस पक्षातीलच काही पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप डॉ. अभय पाटील यांनी करून मुंबईतील बैठकीदरम्यान प्रदेश काँग्रेस कमिटीकडे तक्रार केली होती. त्याची गांभिर्याने दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्यकारिणीत सचिव पदावर कार्यरत असलेले प्रशांत गावंडे यांच्यावर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा आदेश बुधवार, १२ जून रोजी प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे (प्रशासन व संघटन) यांनी काढला आहे.