अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सार्वजनिक बांधकाम विभाग तथा नगर परिषद द्वारा उपविभागिय कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत रस्त्याच्या रुंदीकरण केल्या जात आहे.
या मार्गावर कित्येक लोकांनी नजूलच्या जमीन वर अतिक्रमण केले होते. आता जेव्हा मार्ग रुंदीकरणचे काम सुरू झाले तेव्हा या अतीक्रमण धारकांची पोल खुलली. यात मोठ्या व्यवसायिक बरोबर छोटे व्यवसायिक ही भरडल्या गेले असून त्याच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. यावेळी हातावर आणून पोट जगविणारे हे छोटे व्यावसायिक आता त्या जागेवरून बेदखल झाले आहे. मोठ्या व्यवसायिकावर झालेल्या कार्यवाहित डॉ. काकडे, के ज्वेलर्स, ओम शांति कलेक्शन, कोठारी आय हॉस्पिटल, अर्थर्व स्टेशनरी प्रिंटर्स या अतिक्रमण धारका वर कारवाही करण्यात आली.
या सोबतच लक्ष्मी टॉकीज, एचडीएफसी बैक, सुवर्णा कंगन, डॉ. मनोहर यांनी केलेले अतिक्रमण तोडण्यात आले आहे. सोबतच आपला उदर निर्वाह करण्या साठी मार्गावर हाथ ठेले लावून जगणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना देखील इथून बेदखल व्हावे लागले आहे. अश्या प्रकारे शहर विकास कार्य होत असल्याने शहरवासी बेहाल झाले आहे आणि अश्या विकासकामा मुळे शहर वासियात असंतोष पसरत आहे.
शासन आणि नगर परिषद प्रशासनाने शहरातील बेरोजगार तरुणांसाठी कुठलाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे अनेक बेरोजगारी आपले कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी शासकीय जागेवर अतिक्रमण करून रोजगार निर्मिती केली. त्यांचे कुठेही पूर्ववसन न करता अशा बेरोजगार तरुणांचा छोट्या व्यवसायावर अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करून त्यांना बेरोजगारीच्या खाईत तर नगर परिषद प्रशासन लोटणार नाही ना अशा प्रश्न आज हे बेरोजगार विचारत आहे.