प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सूनेवर वाईट नजर ठेवणाऱ्या सासऱ्याला पोटच्या मुलानेच संपवल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील नसस्कारी गावचे बाबाराव महादेव पारिसे वय 55 वर्ष यांची 27 मे रोजी धारदार शस्त्राने वार करून तसेच डोक्यावर जबर प्रहार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. बाबाराव पारिसे हे रिचार्ज करण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. वर्धा नदीपात्रालगत गेलेल्या पायवाटीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
दोन आठवड्यापूर्वी मृतक व्यक्तीच्या मुलासह कुटुंबाने हत्याची तक्रारीवर पोलीसात केली होती. त्यात पोलीस मागील दोन आठवड्यांपासून प्रकरणाचा तपास करत होते. सर्वदूर तपास केल्या नंतर आरोपीच्या कुठलाही सुगावा लागत नसतानाही आरोपीच्या एका चुकीमुळे पोलिसांनी या प्रकारणाचा छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांना आरोपी मुलगा आणि त्याच्या मेव्हण्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भरसवाडा येथे वर्धा नदीच्या पात्राजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनीच हा हत्या असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांची तब्बल सहा पथके या हत्येचा प्रकरणावर काम करत होती. अनेक बाजूंनी तपास करूनही काही सुगावा पोलिसांना लावत नव्हता. मात्र गाडीवरच्या एका बारीक डागामुळे बिंग फुटले आणि मुलानेच आपल्या मेव्हण्याच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचे समोर आले.
प्रथम गळा आवळला, नंतर कुऱ्हाडीने वार: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी नागोराव बाबाराव पारीसे वय 34 वर्ष याने मेव्हणा विलास केवदे वय 28 वर्ष याच्या मदतीने वडील बाबाराव पारिसे वय 56 वर्ष यांची हत्या केली. आरोपींनी आधी बाबाराव यांचा गळा आवळला. त्यानंतर धारदार शस्त्रांने त्यांच्या गळ्यावर वार करुन कुऱ्हाडीच्या साहाय्याने डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात बाबाराव यांचा जागीच मृत्यू झाला.
नागोराव आणि कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत होते. मात्र पोलिसांना काहीच हाती लागत नव्हतं. अखेर हत्या करण्याकरता दोन्ही आरोपींनी जी मोटार सायकल वापरली होती त्यावरुन पोलिसांना एक धागा मिळाला. मोटार सायकलच्या डिक्कीवर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर गुन्ह्याची उकल झाली आणि मुलगा नागोरावच या हत्येमागे असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मृतक बाबाराव यांची सुनेवर वाईट नजर होती. याच बाप-लेकामध्ये नेहमी खटके उडत असत. ज्या दिवशी हत्येची घटना घडली त्या दिवशीही दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झाले होते. अखेर मुलाने वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला.