मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातून मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या 4 दिवसात नवरीची हळद सुखण्या अगोदरच नवरदेवाच्या मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरला आहे. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी व इतर नातेवाईकांसाेबत फिरायला आलेल्या नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचविताना भाउजीचाही मृत्यू झाल्याची घटना 11 जून राेजी दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास घडली.नवनीत राजेंद्र धात्रक वय 27 वर्ष रा. चंद्रपूर असे साळ्याचे तर बादल श्यामराव हेमके वय 39 वर्ष रा. आरमाेरी असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
नवनीत यांचे 7 जून राेजी लग्न झाले. लग्नानंतर ते बादल हेमके यांच्या घरी आले. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक हाेते. ते भामरागड येथे राहत हाेते. हेमके व धात्रक यांचे कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेले हाेते. नवनीत हा धबधब्यात आंघाेळ करत असताना खाेल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बादल हेसुद्धा पाण्यात उरतले. मात्र दाेघांनाही पाेहता येत नसल्याने दाेघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती लाहेरी पाेलिस मदत केंद्राला देण्यात आली. दाेघांचेही मृतदेह भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. लाहेरी पाेलिस मदत केंद्रात संपूर्ण कुटुंबाचे बयाण घेतले जात हाेते.
हळद मिटण्यापूर्वीच पतीचा मृत्यू.
या नवीन दाम्पत्याच्या लग्नाला अगदी 4 दिवस झाले हाेते. नवनीत व त्यांची पत्नी दाेघेही फिरण्यासाठी बिनागुंडा येथे आले हाेते. दाेघांनीही सुखी संसाराचे स्वप्न बघितले हाेते. मात्र हे स्वप्न अधुरेच राहिले. अवघ्या 4 दिवसांतच नवनीतने जगाचा निराेप घेतला. त्यामुळे नवविवाहितेवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. एकाच नात्यातील दाेघांचा मृत्यू झाला. हेमके व धात्रक कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.