लेखक: राजकुमार वरघट, नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- सर्वांगाने ऐतिहासिक जगातील सर्वाधिक लोकसहभाग असलेली भारतीय लोकशाही याच लोकशाहीचा सोहळा नुकताच अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रुपात सपन्न झाला बलाढ्य,अवाढव्य आणि रंजक असणाऱ्या या निवडणुकीवर देशाचे नव्हे तर साऱ्या जगाचे लक्ष लागले होते कारण ही निवडणूक सर्वांगाने ऐतिहासिक होती ही निवडणूक विविध संस्कृति, परंपरा, भाषा, बोली, विविध धर्म या विविधतेने नटलेल्या भारताची दिशा आणि दशा ठरवणारी होती देशाचे भविष्य, आर्थिक, सामाजिक,न्यायाची होती सविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी होती. सविधानाचे रक्षण करण्यासाठी होती.
लोकशाही ही १ विधिमंडळ २ न्यायपालिका ३ प्रशासन ४ प्रसार माध्यम या चार स्तंभावर उभी आहे. त्या स्तंभाच्या मजबुती करिता होती कारण नव्हे एवढे प्रश्नचिन्ह या स्तंभावर उपस्थित केले गेले इथपर्यंत ठीक होते पण या स्तंभावर जेव्हा अविश्वास व्यक्त होवू लागला ही धोक्याची घंटा होती आणि आहे हे देशासाठी, भारतीय लोकशाहीसाठी घातक होते आहे या अविश्वासाला कारणेही तशीच होती.
राज्यपाल सारख्या सैविधानिक पदाची गरिमा ही या काळात गमावली हे लोकशाही करीता चिंतेचा बाब होती केंद्रीय तपास यंत्रणा यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होने ही काही नवीन नव्हते या आधी पण सीबीआय ला पिंजऱ्यातील पोपट संबोधल्या गेले पण तरीही विश्वास कायम होता आम जनतेला बिडी,सीडी,काडी तर माहित होते पण इडी माहित नव्हती ती तर माहित झालीच पण तिच्या कार्यप्रणाली वर सुप्रीम कोर्टने ताशेरे ओढले. त्यामुळे सामान्य माणसाला प्रश्न पडणं लाजमी होतं प्रशासन कुणाच्या तरी दबावात काम करत आहे हे जाणवत होतं त्यांना जणू स्वातंत्र नव्हतं हे लक्षात येत होतं. न्यायव्यवस्थेवर सुद्धा कुजबुज सुरु झाली होती. निवडणूक आयोग हि त्यातून सुटलं नाही निवडणूक आयोगाचे मुख्यआयुक्त निवडीपासून तर निवडणूक आयोगाच्या कार्यपध्द्ती पासून त्यानी घेलेल्या निर्णयापासून तर दिलेल्या निकाला पर्यंत (मूळ पक्ष कुणाचा मूळ चिन्ह कुणाचं) तिथे शंकेला वाव होता.
त्यात प्रसार माध्यमांनी तर हद्दच पार केली शो चे अँकरच पक्ष्याचा प्रवत्ता असल्या सारखे वागत होते. सत्ता पक्षाला कोंडीत धरायचे सोडून सत्ता पक्षाला प्रश्न विचारायचे सोडून विरोधी पक्षाला धारेवर धरताना दिसले प्रसार माध्यमांनी आपली भूमिका सोडलेली दिसली आपल्या कर्तव्यांपासून दूर जातांना दिसले हे लोकशाही साठी शुभ संकेत नव्हते. लोकशाहीत विरोधी पक्षाला फार महत्व आहे पण विरोधी पक्ष विखुरलेला दिसला आणि सत्ता पक्षाला तर विरोधी पक्षच हवा नव्हता ते विरोधी पक्ष मुक्त भारत करायला निघाले होते लोकशाहीत मजबूत सरकार म्हणजे बहुमताचे सरकार असले तर देश्याच्या हिताचे असते पण राक्षसी बहुमतामुळे सरकार हुकूमशाही कडे वाटचाल करतांना दिसले हे लोकशाही करीत चांगले लक्षण नव्हते लोकशाहीत व्यक्तिकेंद्रित होणे याला लोकशाहीत वाव नाही पण या दिवसात एका व्यक्तीकर ती केंद्रित झाली होती हे तानशाही कडे वाटचाल करणारं होतं.
तोडफोडीचं राजकारण कुठल्या कुठे निघून गेलं पुरोगामी, सुसंकृत महाराष्ट्राला तर हे शोभणार नव्हतं यामुळे महाराष्ट्राची अस्मिताचं पणाला लागली यामुळे हि निवडणुक महत्वाची होती लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या राजावर हि प्रश्न उपस्थित झाले मतदार राजाला गृहीत धरल्या गेले म्हणूनच पोटापाण्याचे प्रश्न सोडून, बेरोजगारी, महागाई, आरोग्य, शिक्षण, शेतकरी आत्महत्या, हमीभाव या मूलभूत गरजा याकडे मतदार राजा दुर्लक्ष करून धार्मिक भावनांची झूल पांघरुण आलेल्या नेत्यांच्या चक्रव्यूहात अडकला आणि आपल्या मताचा अधिकार वापरतांना चुकला. म्हणून हि निवडणूक मतदार राजाची परीक्षा घेणारी होती त्याच्या अधिकाराची होती त्याचा अधिकार या देशाचे भविष्य घडविण्या करीता, लोकशाही वाचविण्याकरीता कारणीभूत ठरणारं होतं. आणि निकाल लागला निर्वाचित हा निकाल मतदार राजाच्या सामूहिक शहाणपणाला सलाम करणारा असा आहे. या निकालाने जगभरातील लोकशाहीप्रेमींच्या चेहऱ्यावर समाधानाचे, संतुष्टीचे स्मितहास्य झळकले इतका हा निकाल सामूहिक शहाणपणाचा, सुजाण, समजुतीचा व संतुलित होता असा निकाल जगाच्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातून येणे हे समाधानाचे आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला नवा इतिहास लिहण्याची संधी देणारी हि निवडून ठरली दहा वर्षांच्या कालखंडात जगातील राजकारण सुधारत असतांना भारताच्या राजकारण कुठे झुकेल हि चिंता होती महागाईने त्रस्त जनता त्यांचा आक्रोश, शेतकऱ्यांचा जिन्या मरण्याचे प्रश्न, बेरोजगारी त्यामुळे तरुणांचे स्वप्नांचा चुराडा सरकारचे याकडे दुर्लक्ष होते सरकार मात्र ३७० कलम हटवणे, रामंदीर, नोटबंधी नागरिकत्व सुधारणा कायदा, तीन तलाक सारखे अताक्रिक निर्णय घेत राहिले राक्षसी बहुमताचा वापर अजेंड्यासाठी झाला त्यामुळे शेतकरी, तरुणवर्ग, महिला यांच्याकडे दुर्लक्ष झाले. निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरांचा पुरेपूर प्रयत्न्न केला गेला नावाला उरलेला विरोधी पक्ष एकवटला न्याय यात्रे द्वारे लोकांना जोडत गेला आणि मतदार राजा सुजाण होत गेला कशाला बळी न पडता आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून संयमाने मतदानाला घराबाहेर पडला लोकशाहीच्या पर्वात सहभागी झाला आणि निकाल आला तो सत्याधाराला विचार करण्यास भाग पडणारा केलेल्या चुका सुधारण्यास भाग पडणारा असाच आहे. विरोधी पक्षाला संजीवनी देणारा सरकारला सळो कि पळो करून सोडणारा एकाधिकाराला लगाम लावणारा तानाशाहीला रोखणारा हुकूमशाही तोडणारा गुर्मी मोडणारा व्यक्तिकेंद्रित वलय घालवणारा मोदी सारख्या ब्रँड फक्त दीड लाखाच्या फरकाने निवडून येऊ शकतो हि या लोकशाहीची ताकत आहे. जनतेला गृहीत धरून चालत नाही हि निवडणूक धडा देणारी लोकशाहीत एक अकेला सौ पर भारी कधीच होऊ शकत नाही हे लोकशाहीचे मूलभत तत्व आहे. म्हणून हि निवडणूक सर्वांगाने ऐतिहासिक अशी होती या निकाला निमित्याने लोकशाही आणखी समृद्ध होईल मजबूत होईल लोकशाहीच्या रक्षणासाठी हे गरजेचं होतं पुन्हा एकदा नवीन सरकारचे अभिनंदन या सरकारच्या काळात देश प्रगतीचे शिखर पार करो आदर्श सरकार म्हणून इतिहासात आपले नाव सुर्वण अक्षराने नोंदवावे अशी सर्व भारतवासी अपेक्षा करतो लोकशाहीचा विजय असो.