अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- योग हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग असल्याचे प्रतिपादन करतांना आज गतिशील दिनचर्या मुळे दैनंदिन आरोग्याकडे दूर्लक्ष होतांना दिसते. त्यामुळे विविध दुर्धर आजारांना अल्पवयात सामोरे जावे लागते. योगाभ्यासातून मानवी आरोग्य व मन निरोगी संपन्न व बल शाली होण्यास चालना मिळत असल्यानेच आज योगाला आंतर राष्टीय मान्यता प्राप्त झालेली आहे. प्रत्येकानी दररोज योगासने व सूर्यनमस्कार करावेत असे आवाहन डॉ. घोरपडे यानी केले.
ते 10 व्या आंतराराष्ट्रीय योग दिना निमित्य महिला पतंजली योग समिती वर्धा हिंगणघाट, पतंजली परिवार हिंगणघाट व अभिनव विचार मंच हिंगणघाट तर्फे जे.आर.निखोडे लॉन व सभागृह हिंगणघाट येथे आयोजित भव्य योग व प्राणायम व आरोग्य तपासणी शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी मंचावर हिंगणघाट नगरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व चैतन्य कन्ट्रक्शन चे संचालक बाळूभाउ शिंदे, पतंजली चिकित्सालय हिंगणघाटचे संचालक यश भुतडा, पतंजली चिकित्सालयाच्या डॉक्टर दीपिका जयस्वाल, माजी नगरसेविका छायाताई सातपुते, योग शिबिराचे मार्गदर्शक जिल्हा प्रभारी महिला पतंजली योग समिती वर्धा च्या पोर्णिमा धात्रक, राहुल वंजारे, रणजित जिवने, विजय धात्रक, प्राची पाचखेडे, सुत्रसंचालक नितिन सुकळकर आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये योग, प्राणायम, सूर्यनमस्काराचे मार्गदर्शन करण्यात आले व प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त होणाऱ्या प्रोटोकॉलचे प्रात्यक्षिक सुद्धा करून घेण्यात आले. योग वर्गानंतर डॉक्टर दीपिका जयस्वाल यानी शिबीरार्थ्याची आरोग्य तपासनी करूण उपचार केले . शिबीराला 118 महिला व पुरूष उपस्थित होते. योग शिबिरातील सर्व योग साधका करीता अल्पोपहाराची व्यवस्था स्नेहल किसान नर्सरीचे संचालक दिगंबर खांडरे यांनी केली. सुत्रसंचालन नितिन सुकळकर यांनी केले.