मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगनघाट:- पर्यावरणात होणारा बदल हा मनुष्याचे जीवनमानावर व आरोग्यमय बाबीला परिणामकारक तापमान वाढीने तथा जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असता आपली वसुंधरा सृष्टी, वृक्षवल्ली, वाचविण्याचे कार्य आपणांस करावे लागणार आहे असे मत राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे अजय उर्फ मुन्नाजी महाजन यांनी व्यक्त केले.
निसर्गानंद ग्राम विकास प्रतिष्ठान व भारतीय युवा संस्कार परीषदेचे वतीने ५००० हजार वृक्षारोपण व संवर्धन अभियानाची सुरुवात अजय उर्फ मुन्नाजी महाजन यांचे लग्नादी वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा मित्रपरिवार व निसर्गानंद परिवार तथा भारतीय युवा संस्कार परीषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येते हा दिनोत्सव, ना पुष्पगुच्छ, ना हार एक व्यक्ति शुभेच्छा एक १००/- रुपयांचे वृक्ष लावू झाड या योजनेनुसार मुन्नाजी महाजन दांम्पत्यांचा शुभविवाह दिनोत्सव ३७००/- रुपयें रोख सुपूर्द करुन जांभळापाणी, ता.उमरेड येथील रचनात्मक कार्यासाठी दत्तक घेतलेल्या गावात वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल साधून आपली वसुंधरा सुजलाम सुफलाम व्हावी हा उद्देश्य ठेवून सामाजिक, रचनात्मक, प्राकृतिक विकासयुक्त अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय युवा संस्कार परीषदेचे संस्थापक प्रदीपकुमार नागपुरकर,निसर्गानंद परिवाराचे भगवानदास राठी, संघाचे जेष्ठ स्वयंसेवक किशोर कोठीवान, जेष्ठ शिवसैनिक शेखर खरवडे,विनोद लांजेवार, गोपाल लांजेवार, महेश बावणे, लक्ष्मीकांत चौधरी, चंद्रकांत राऊत, अजय मने, कु.शारदा वाहणे, कु. शर्वरी खरवडे, चेतन काळे, रेडलावार, विलास ढोबळे, आदींचे सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.