प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे राष्ट्रीय महामार्ग 44 व भीषण अपघाताची घटना समोर आली आहे यात माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरती वाघमारे व त्यांचा मुलगा अक्षय वाघमारे मृतकाचे नावे आहे.
हिंगणघाट नगर परिषदेच्या स्वास्थ्य विभागात कर्मचारी असलेल्या मृतक आरती वाघमारे या बरेचदा वर्धेवरून हिंगणघाट येथे जाणे येणे करायच्या. आज त्यांनी हिंगणघाट येथील बँकेतून आपली वेतनाची रक्कम काढली व सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हिंगणघाट वरून आपल्या मुलासह दुचाकीवर वर्धेच्या दिशेने निघाल्या असताना राष्ट्रीय महामार्ग 44 वर नांदगाव चौकापासून दीड किमी अंतरावर वणा नदीचा पुल ओलांडून वर्धेकडे जाणार्या वळणमार्गावर वळत असताना बेंगळुरु येथे जाण्यासाठी भरधाव वेगाने निघालेल्या एच आर 38 ए व्ही 5937 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली. यात आरती व त्यांचा मुलगा अक्षय वाघमारे या माय लेकाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.