Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुरात महाविद्यालयात तरुणी देहव्यवसायाच्या दलदलीत, पोलिसांनी धडक कारवाई करत 5 आरोपीला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 18, 2024
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुरात महाविद्यालयात तरुणी देहव्यवसायाच्या दलदलीत, पोलिसांनी धडक कारवाई करत 5 आरोपीला ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात देहव्यापाराचे अड्डे मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यात अल्पवयीन मुलींसह महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणी झटपट पैसा कमावण्याच्या नादात या दलदलीत अडकू लागल्या आहे. गुन्हे शाखेने जोरदार कारवाई करत रविवारी दोन देहव्यापाराच्या अड्ड्यांवर घातलेल्या छाप्या घातला त्यात ही बाब उघड झाली.

नागपूर शहरातील सदर येते छावणी परिसरात एका सलूनच्या आड सुरू असलेल्या देहविक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. तेथून 4 देहविक्री करणाऱ्या तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सलून चालक महिलेसह दोन ग्राहक, अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. साक्षी ऊर्फ मनीषा चंद्राहास तुपे वय 30 वर्ष, रा. उर्वेला कॉलोनी, वर्धा रोड, राकेश साबुलाल बंदेवार ऊर्फ राज ठाकूर वय 33 वर्ष, रा. उज्ज्वलनगर, सोमलवाडा, अभिषेक प्रभाकर माहुरे वय 32 वर्ष, रा. प्लॉट नं. ८९ मनीषनगर, मोहन भगवंतराव सुरकर वय 40 वर्ष, रा. निलडोह, हिंगणा व राजेंद्र चिंतमणराव पांडे वय 52 वर्ष, रा. वानाडोंगरी, हिंगणा अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी महिला मनीषा तुपे छावणी येथील ‘द लुक लक्झरी सलून स्पा’मधून देहव्यापार करत होती. मागील 6 वर्षांपासून ती या व्यवसायाशी जुळलेली आहे. अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना जाळ्यात ओढून त्यांना ब्युटी पार्लरमधून आंबटशौकीन ग्राहकांकडे पोहोचवण्याचे काम ती करीत होती. मनीषाने आतापर्यंत याच व्यवसायातून लाखोंची कमाई केली. तिने शंभरावर मुलींना शहरातील वेगवेगळ्या स्पा-सलूनमध्ये देहव्यापारासाठी पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी मनीषा हिच्या देहव्यवसायची पोलखोल करण्यासाठी गुन्हे शाखेने एक बनावट ग्राहक तेथे पाठवला. मनीषाने एका तरुणीला त्याच्यासोबत पाठवले. त्याने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला. आरोपी मनीषा, राकेश व अभिषेक हे चार तरुणींना देहव्यापार करण्यास प्रवृत्त करताना आढळले. याशिवाय, मोहन व राजेंद्र हे तिथे ग्राहक म्हणून मिळून आले. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून त्या चारही तरुणींची सुटका केली आणि 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सदर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, नंदकिशोर देवगडे, जयंता, राधा, नीलिमा, आशीष, प्रमोद यांनी केली.

Tags: नागपुरात महाविद्यालयात तरुणी देहव्यवसायाच्या दलदलीतनागपूर देहव्यवसायनागपूर पोलीससदर पोलीस स्टेशनसाक्षी ऊर्फ मनीषा चंद्राहास तुपे
Previous Post

हिंगणघाट वणा नदीच्या पुला जवळ ट्रॅक आणि दुचाकीचा भीषण अपघात, माय लेकाचा जागीच मृत्यू.

Next Post

गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत.

गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In