स्व. प्रा. ज्ञानेश्वरराव वैद्य व स्वर्गीय चंद्रकला वैद्य स्मृती निमित्त आयोजन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पत्रकार संघ हिंगणघाटच्या वतीने दिनांक २३ जून रोजी दुपारी ३.३० वाजता जी. बी. एम. एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सभागृहात स्व. प्रा. ज्ञानेश्वराव वैद्य व स्व. सौ चंद्रकला वैद्य यांचे स्मृतीनिमित्त हिंगणघाट रत्न पुरस्कार, हिंगणघाट भूषण पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण मुंडे, हिंगणघाट नगर परिषदेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड व प्रा.अनिल फुटाणे, प्राचार्य जी. बी. एम. एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट उपस्थित राहणार आहे.
सदर कार्यक्रमात राष्ट्रीय सायकल पोलोपटू स्व. सत्यशील रेवतकर यांना मरणोत्तर हिंगणघाटरत्न पुरस्कार तसेच वन्यजीव रक्षक राकेश झाडे यांना हिंगणघाट भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दहावी, बारावी व नीट परीक्षेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, सचिव राजेश कोचर उपाध्यक्ष मुकेश चौधरी तसेच पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.