संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 20 जून:- दरवर्षी प्रमाणे यंदाही जेष्ठ नागरिक संघ राजुरा तर्फे श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे इयत्ता बारावी 80 टक्के गुण प्राप्त व इयत्ता दहावी 90 टक्के गुण प्राप्त गुणवंत विद्यार्थीची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी एम. वारकड, प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, वर्षा एम. काकडे, प्राचार्य, ऍड. यादवाराव धोटे महाविद्यालय राजुरा, पांडुरंग हाके, पोलीस उप निरीक्षक, पोलीस स्टेशन राजुरा, डॉ. सुरेश उपगणलावार, माजी अध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ राजुरा, त्र्यंबक गंगशेट्टीवार, मुख्याध्यापक, न्यू एरा विद्यालय राजुरा, सरिता जाधव, अंजली वारकड, रजनी ठाकुरवार, माजी प्राध्यापिका जी. प. कनिष्ठ महाविद्यालय राजुरा, बंडू माणुसमारे, माजी अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन राजुरा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्वागतगीत स्वरप्रिती कला अकादमी यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदर्शन दाचेवार, अध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ राजुरा यांनी केले. नोंदणीकृत संघटना असूनही आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याने देणगी स्वरूपातील सहकार्याने आम्ही सामाजिक, शैक्षणिक उपक्रम घेतो तर याकरिता संघातील सदस्य मोकळ्या हाताने आर्थिक मदत करतात असे प्रास्ताविकातून दाचेवार यांनी मत व्यक्त केले.
संभाजी वारकड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी भविष्यातील वाटचालीरिता संधीचे सोने करावे व कठोर परिश्रम घ्यावे असे मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता दहावी व बारावी च्या एकूण पासष्ट गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीभाऊ डोर्लीकर यांनी केले तर आभार कुर्मदास पावडे, सचिव जेष्ठ नागरिक संघ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्याप्रकाश कल्लूरवार, रामचंद्र मुसळे, मधुकर जानवे, भास्कर येसेकर, डॉ. विठ्ठल रागीट, शंकर बानकर, मनोहर टाके, सुरेश बोधे यांनी अथक परिश्रम घेतले.