Suicide होय आत्महत्या यावर आज बोलायला हवे अस वाटतय नुकताच एक लेख वाचला थोडा राग आणि थोड़ मन हळव झाल म्हणून व्यक्त होतीय.
मित्रांनो आत्महत्या का करावी??तुम्ही कधी तरी अस ऐकलय का की कुठल्या तरी खुन्याने किंवा बलात्कारी ने किंवा कुठल्या तरी दरोडेखोराने आपल आयुष्य संपवलय???? नाही न?? मग एक चांगल्या सुशिक्षित लहानपाना पासून ते मोठ झाल्यापर्यंत जर एखादी मुलगा/मुलगी जीवन जगायला संघर्ष करत असेल तर त्यात वाईट काय??निव्वळ मोठ्या अपेक्षाच का केल्या जातात तेही फार कमी वेळातच??? म्हणजे आयुष्य हे फक्त उच्च शिक्षण,लठ्ठ पगाराची नोकरी सरकारी असेल तर फार दर्जेदार मग स्वतः च घर, गाडी इत्यादि अपेक्षा तेही या काळात कितपत योग्य वाटतंय??? फक्त हेच सगळ असणारे जीवन जगत असतात अस असत काय??
आपण कुठल्या जगात आहो?इथे इतक चिल्लर समजून ठेवलय हो आयुष्याला की दररोज कुणी न कुणी आपल आयुष्य संपवताना दिसतय असले मानसिक रोगी बघून मला वाटत की जन्म तरी का भेटली यांना??आणि दुसरीकडे इतकी काही लोक असंख्य भयानक आजाराने ग्रासले आहेत तरीही त्यांचा तोडूँन कधीच आत्महत्या करतो हे बोल निघत नाही.मग आपल्याला जर निसर्गाने सगळेच काही साबूत ठेवलय तर फक्त आयुष्य जगायला पाठवल तरी ही आपल्याला तेही निट जगायला का येत नाही ??किती हा मुर्खपना असेल हो की नाही???
पैसा च सगळ नसतो आणि खुप लठ्ठ पगारी नोकरी असन ही गरजेच नसत तर एक आनंदी आयुष्य जगण महत्वाच् असत, इतके अवाक्या बहेरच अपेक्षा ठेवून जे मुलांना मानसिक रोगी बनवतात त्या लोकांनी जरा तरी विचार करावा की आयुष्य जगायला नेमक काय अपेक्षा ठेवल्या पाहिजे आणि काय नको कारण प्रत्येक मूल हे त्याच्या परिने बेस्ट च देत असतो कुणी लवकर तर कुणी उशिरा घडत असत आणि यात त्या मुलांचा काहीच दोष नसतो, कारण निसर्ग प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्य वेळीच घडवत असतो तर त्याला त्याच वेळ घालवू ध्या जन्म घेतलाय तर तो ही काहिं न काही करेलच उगाच अवाक्या बाहेरच अपेक्षा करून शेवटी मूल हे असले टोकाच पाऊंल उचलून घेत आत्महत्या करून स्वतःच आयुष्य संपवतात याला आळा घलायला हवा आणि भावी पिढिच आयुष्य सुखी आणि आनंदित कस जगायला हव हयासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.
नैराश्य,दुःख अति अपेक्षा या सर्वातून निघता येत असत पण जे या सगळ्याला बळी पडतात त्यांचा असाच करून अंत होत असतो तर एक योद्धा बनून असल्या विचारांवर मात करायला शिकले पाहिजे आणि जगायच कस ह्या करता प्रत्येक शहर ,गाव यात मोफत शिबिर भरवले गेले पाहिजे.जेने करून असा कोणीही आत्महत्या करणार नाही..
✍️ लेखिका:- कु.सुप्रिया ढोके, नागपूर