संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 21 जून:- गडचांदूर पासून पाच किमी अंतरावर असलेल्या निसर्गरम्य आणि दरवर्षी महाशिवरात्री ला मोठी यात्रा भरत असते त्या शंकरदेव परिसरात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती द्वारे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार उपस्थित होते. यावेळी वनरक्षक विजय ताकसांडे, अरुण टेकाम व संस्थेचे पदाधिकारी दिवाकर नावडे, दीपेश वनकर, रोहित दुरटकर, प्रणीत निवलकर, अजय गिरटकर, दीपक देवकते, सुरज गोंडे, स्वनिल तादुवार, हिमांशू बुरडकर, सागर बावणे, सुजल पेठकर, पवन बोथले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध प्रकारच्या प्रजातीची झाडे मंदिर परिसरात लावण्यात आली. सामाजिक दायित्व स्वीकारून हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.