पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हिंगणा पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाने कौटुंबिक वादातून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गिट्टीखदान पोलिस वसाहतीत रविवारी सकाळी उघडकीस आली. विजय चवरे वय 38 वर्ष, रा. पोलिस वसाहत असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाची पत्नीही कोराडी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल असल्याची माहिती आहे.
गिट्टीखदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय हा मुळचा चंद्रपूरचा रहिवासी आहे. असून मागील वर्षभरापासून तो हिंगणा पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याची पत्नी रेणुका वय 36 वर्ष ही कोराडी पोलिस ठाण्यात पोलीस शिपाई आहे. विजयला दारुचे व्यसन होते. दारु पिल्यानंतर तो नेहमीच पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत होता. यावरून नेहमीच दोघांमध्ये खटके उडत असत. शनिवारी विजय कामावर गेला. तो दुपारी परत आला असता त्याला पत्नी घरी दिसली नाही. त्याने फोन करून विचारना केली असता पत्नीने आपण खरेदीसाठी बाजारात आल्याचे सांगितले. त्यावर विजय संतप्त होऊन बाहेर निघून गेला.
यावेळी मृतक विजयची पत्नी रेणुका घरी परतली असता विजय घरी नव्हता. सायंकाळी रेणुका जेवन करून मुलासोबत फिरण्यासाठी गेली. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास विजय घरी परतला. त्याने पत्नी रेणुकाला फोन करून घरी येण्यास सांगितले. परंतु तुम्ही नेहमीच दारू पिऊन भांडण करता, असे म्हणून तिने फोन ठेवला. परंतु राग शांत झाल्यावर रेणुका घरी परतली असता विजयने दार उघडले नाही. त्यामुळे रेणुकाने आपल्या मुलासह पार्किंगमध्ये असलेली कार क्रमांक MH 31 FU 8310 मध्ये रात्र काढली. सकाळी ती घरी गेली असता विजयने दार उघडले नाही. घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता विजय गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. विजयने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.