नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने अभिनंदनाचा ठराव व विरोधकांच्या अपप्रचारामुळे पराभव: माजी खासदार अशोक नेते
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी रविवारी दुपारी गडचिरोलीच्या विश्राम भवनात बैठकीचे आयोजन केले होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे आणि धर्मपाल मेश्राम, तसेच भाजपचे प्रकोष्ठ संयोजक तथा चार्टर्ड अकाउंटंट मिलिंद कानडे यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पराभवामागील कारणे जाणून घेतली.
सर्वप्रथम जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून बैठकीला सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी खासदार अशोक नेते यांनी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला सर्वांनी एकमताने प्रतिसाद दिला.
यावेळी नेते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी मागील १० वर्षात प्रगतीशिल, विकासशिल भारत घडविण्यासाठी अनेक योजना आणल्या. दीन-दलित, शोषित, वंचितांपर्यंत त्या योजनाही पोहोचवण्यात आल्या. देशाला विकासाची दृष्टी देण्यासोबत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखविली. परंतू विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करत संविधान बदलविणार असल्याचा अपप्रचार केला. त्यात ‘अब की बार, 400 पार’ च्या नाऱ्यामुळे मतदारांच्या मनात आणखी शंकेला वाव मिळाला. मात्र गेल्या 10 वर्षात संविधानाच्या आधारेच एनडीए सरकार चालविण्यात आले आणि भाजप नेहमीच संविधानाचा सन्मान करत राहणार, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मेहनत घेणार्या लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार व्यक्त करत भाजपाच्या संघटनेचे व पुढील वाटचालीत जनतेच्या हिताची कामे सुरूच ठेवणार असल्याचे ते सांगितले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी समिक्षा बैठकीला जय – पराजय होणे साहाजिकच आहे. पराजयाला हार न मानता व पराभवाचे कारण मिमांसा न शोधता भाजपा संघटनेच्या जोरात कामाला लागा असे विस्तृत मार्गदर्शन भाजपा संघटनेबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांना केले. तसेच माजी आमदार प्रा.अतुल देशकर, धर्मपाल मेश्राम, प्रशांत वाघरे, अँड. येशूलाल उपराडे यांनी सुद्धा समिक्षा बैठकीला विस्तृत व उत्कृष्ट पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी समिक्षा बैठकीला मंचावर प्रामुख्याने प्रदेश उपाध्यक्ष संजयजी भेंडे, धर्मपाल मेश्राम, मिलिंद कानडे, मा.खा.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ.कृष्णाजी गजबे, गडचिरोली-गोंदियाचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ॲड.येशूलाल उपराडे, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश भूरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जेष्ठ नेते झामसिंग येरणे, प्रमोद संगिडवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा गिता हिंगे, जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे, तसेच भाजपाचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.