अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्य सरकार कडून वर्धा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे घोषीत करण्यात आले असून तसा शासन निर्णय सुध्दा झाला आहे. प्रस्तावित मेडीकल काँलेज शहरातील उपजिल्हा रुग्नालया मागील शासनाच्या जागेतच व्हावे या करीता हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समीती कडून जिल्हाधिकारी याना निवेदन देताना जागेचां 7/12 पण देण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी यांना आज निवेदनात नमुद करण्यात आले कि संघर्ष समीती कडून उपजिल्हा रुग्णालयाला लागुन शासकीय जागा खाली असुन शहराच्या विकासाच्या दृष्टीने हि जागा निश्चित करण्यात यावी. परंतु हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत हिंगणघाट शहरापासून काही अंतरावर असलेल्या वेळा येथील जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून आरोग्याच्या दृष्टीने ही जागा सोयीची होणार नसुन उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील जागेचा विचार करावा. अन्यथा मेडिकल कॉलेज संघर्ष समितीकडून पुन्हा जागे संदर्भात आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला.