कोपरणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र कोपरणा तालुका उपाध्यक्षपदी निखिल गजानन पिदूरकर यांची निवड करण्यात आली. त्यामुळे त्याचे सर्विकडे अभिनंदन करण्यात येत आहे.
समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदर तत्पर काम करणारा संघ म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघ होय. निखिल गजानन पिदूरकर यांनी काही वर्षा अगोदर पासून पत्रकारितेला सुरुवात केली. गाव प्रतिनिधी ते शहर प्रतिनिधी त्या सोबत राजकीय क्षेत्रात अनेक पदाची जबाबदारी सांभाळत असंख्य असा लोका सोबत संपर्क असून आज दैनिक पब्लिक पोस्ट चे कोरपणा तालुका प्रतिनिधी म्हणून तालुकास्तरावर काम करत असताना पत्रकारिता म्हणजे काय हे अनुभव त्यांना मिळाले. त्यांच्या उत्तम कामाची दखल घेत त्यांना युवा ग्रामीण पत्रकार संघा मध्ये कोरपणा तालुका उपाध्यक्ष पदावर काम करण्याची मोठी जबाबदारी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र विदर्भ उपाध्यक्ष संतोष उत्तम झाडे यांनी नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन त्यांच्यावर सोपवली.
यावेळी निखिल पिदूरकर यांनी ती जबाबदारी निर्भय व निर्भिड पणे सांभाळेल व सर्व सामान्य जनतेचे मत ऐकून त्यांना त्यांचा हक्क देण्यासाठी शासन, प्रशासन विरोधात असेल किंवा कोणतेही प्रश्न असतील ते त्यांना हक्क मिळवून देण्याचे विश्वासाने काम करेल असे निखिल पिदूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले.

