स्काऊट-गाईड व राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने चित्रकला, प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 26 जून:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे अवचित्य साधून चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पोस्टर द्वारे जनजागृती करण्यात आली.
२६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो. अंमली पदार्थ सेवनमुक्त जग होण्यासाठी या दिवशी शाळा स्तरावर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय चे संघटक चंद्रकांत भगत, दिपा मडावी, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, छ.शिवाजी महाराज स्काऊट लीडर बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीनी पोस्टर द्वारे ही जनजागृती केली. यावेळी प्रतापवार यांना वडाचे वृक्ष भेट देण्यात आले. व्यसनमुक्ती संकल्प घेऊन स्काऊट-गाईड व राष्ट्रीय हरित सेना विभागातील विद्यार्थी जनजागृती करीत आहे.
यावेळी शिक्षिका सुनीता कोरडे, ज्योती कल्लूरवार, वैशाली टिपले, जयश्री धोटे, अर्चना मारोटकर, मनीषा खामनकर, पूजा विकास बावणे, अंजली कोंगरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजामाता गाईड युनिट लीडर रोशनी कांबळे यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले यांनी केले तर आभार छत्रपती संभाजी राजे स्काऊट युनिट लीडर रुपेश चिडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.