मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:– अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत दिनांक 22 जून रोजी पंचायत समिती सभागृह अहेरी येथे भारतीय रूरल लाँईव्हलीहुड फोडेंशन यांनी आयोजन केले होते. यामध्ये प्रकल्पाचा पाच वर्षाचा आराखडा करण्यासाठी ओडीके अँप द्वारे कसा तयार करायचा याची सविस्तर माहिती प्रशिक्षणा मध्ये देण्यात आली.
यामध्ये जमिनीवर करायची कामे, नाल्यावरील उपचार कामे व उपजीविकेचे कामे शेतकरी व लाभार्थी यांच्या मागणी नुसार अँप नोंदवायची आहेत. हा प्रकल्प महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना संलग्नित असल्याने जास्तीत जास्त कामे येथून करावी व बाकी इतर सरकारी योजना चा लाभ अभिसरण द्वारे लाभार्थी ना देण्यात यावे. या प्रशिक्षणासाठी बायफ अहेरी व YRAभामरागड टिम उपस्थित होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डोर्लीकर बायफ यांनी केले तर प्रस्तावना अरविंद उईके यांनी केली. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन पटले साहेब, श्रीकांत हगरे साहेब यांनी केले तर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी टिम लिडर कुडे साहेब बायफ व सहारे साहेब YRA यांनी मदत केली.