मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विकासाचे नावाखाली देशात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्याने निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर पृथ्वीसोबतच मानवी अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. हाच हेतू बाळगून नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट चे वतीने गोरक्षण संस्थेच्या बोरगाव येथील गौ धाम शेतात विविध प्रजातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
यावेळी या उपक्रमात महेश अग्रवाल, विजय मुथ्था, बृजमोहन करवा, अशोक सिंघवी, निलेश भूतड़ा , सुंदर बसंतानी, रितेश पिपलवा, दुर्गाप्रसाद यादव, नेताजी लाजुरकर, शाम बत्रा, विक्की ठाकुर,बलु ठाकरे,नवनीत पुरोहित,संजय मनमोड़े, विजय शर्मा, विजय मोहता आदी नारायण सेवा मित्र परिवारा चे सदस्य सहभागी होते .