ओबीसी, व्हीजे, एनटी एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरी, जि. यवतमाळ च्या वतीने निवेदन.
नितेश पत्रकार यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वणी:- ओबीसी /व्हीजे/एनटी/एसबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, फ्री शिष्यवृती व इतर ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या अशा विविध मागण्या घेऊन ओबीसी, व्हीजे, एनटी एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरी, जि. यवतमाळच्या वतीने उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्राना निवेदन देण्यात आले.
1) सत्र 2023 – 2024 मध्ये ओबीसी वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देऊन वसतिगृह त्वरित सुरु करा. 2) सत्र 2024 – 2025 मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करा. 3) कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग 11 वी, 12 वी) ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा. 4) कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग 11 वी, 12 वी) ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी, विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करावी.
5) वसतिगृह प्रवेशासाठी व आधार योजनेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन वगळण्यात यावे. 6) शासन निर्णय 16 मे 2012 नुसार एस. सी. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ओबीसी विद्यार्थ्यांचा कोटा 5% करण्यात आला आहे. तो रद्द करून पुर्ववत 20% करण्यात यावा. 7) सन 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून उच्च शिक्षणात ओबीसी विद्यार्थीनींना 100%फी सवलत देण्यात येत आहे.त्याच प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनाही 100%फी सवलत लागू करावी. तसेच फ्री शिप सवलत साठी उत्पन्न मर्यादा रद्द करण्यात यावे.
8) प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2019-2020या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात आली. ओबीसी विदयार्थ्यांना दरवर्षी 500 रुपये खर्च करून आवेदन पत्र सादर केले; परंतु सन 2019ते 2024 या पाच वर्ष्यात त्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली नाही.सर्व विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी. 9) मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा. 10) महाज्योती मार्फत ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना NEET, IIT परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण व मोफत टॅबलेट योजना अर्ज प्रक्रिया त्वरित सुरु करावे. 11) 10वी 12 वी च्या गुणवंत ओबीसी विदयार्थ्यांना राज्यश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती सुरु करण्यात यावी.
या निवेदनाद्वारे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींना सूचित करण्यात येते की, तात्काळ वरील सर्व मागण्या पूर्ण करून ओबीसी विदयार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामास शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहील. अशा इशारा यावेळी प्रदिप बोनगीरवार मोहन हरडे
अध्यक्ष निमंत्रक ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरी, जि. यवतमाळ यांनी दिला.