प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी यांच्या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण, शाळेच्या मुलांना शिक्षणाकरिता किट वाटप करण्यात आले.
आज दिनांक १ जुलै रोजी पिपरी येथे प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण, व सर्व मुलांना शिक्षणा करिता कीट वाटप वाढदिवसा निमित्याने करण्यात आले. यावेळी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद वर्धा सुनील राऊत यांच्या वाढदिवस निमित्याने लाडू तुला हा कार्यक्रम राबवण्यात आले हा कार्यक्रम संतोषराव धाडवे यांच्याकडून लाडू देण्यात आले, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, ग्रामपंचायत सदस्य वडनेर गुरुदयालसिंग जुनी , पिपरी ग्रामपंचायत सदस्य सतीश गुरूनुले यांच्याकडून वृक्षारोपण व मुलांना कीट वाटप वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
सुनील राऊत आपले विचार संपूर्ण गावात त्यांच्या राजकीय चळवळ जिल्हा परिषद पासून तर ग्रामपंचायत पर्यंत त्यांनी सर्व जनतेसमोर मांडले व पिपरी प्राथमिक शाळा येथे स्वच्छता अभियान सर्व गाव एकत्र होऊन राबविण्यात येईल व आपण पिपरी या गावांमध्ये सार्वजनिक भवनाची व्यवस्था व फंड आणण्याचे प्रयत्न करू असे त्यांनी आपले विचार व्यक्त केले सर्व गावकऱ्यांनी त्यांच्या वाढदिवस मोठ्या संख्येने साजरा केला उपस्थित प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, माजी पंचायत समिती सदस्य ओंकार मानकर, डॉ. वर्मा साहेब पोहणा, हिंगणघाट संचालक, तहसील खरेदी विक्री सहकारी संस्था राजेश राऊत, पोहणा सरपंच नामदेव राऊत, हिंगणघाट अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस राहुल वानखेडे, वर्धा जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रशांत दरोडे, वर्धा जिल्हा सहसचिव निलेश नान्ने, नारायण कुंभारे, प्रतीक मुनेश्वर, अविनाश भगत, वसंतराव चरडे, प्रवीण खेलपांडे, हनुमंत मुदगल, देवराव गाऊञै, नागो भेंडारे, बापू चतुरकर, अतुल गुरणुले, राजू पुड़के, रुपेश करमनकर, प्रशांत वाघमारे, सुरेश झोड़े, दिलीप रायमल, पंढरी भगत, भगवान धाबर्डे, गुनवंत मंजेकर, जीवन बिलबिले, प्रमोद चरदे, सचिन पवार, विजुभाऊ लाटकर, अतुल धाडवे, अक्षय झुंघरे, राजू पाझारे कोल्ही, गजानन गिरडकर खेकडी तसेच महिला सौ रत्नाताई राऊत, सौ सुवर्णा गुरणुले, सौ वर्षाताई चौधरी तसेच मोठ्या संख्येने हा कार्यक्रमांमध्ये गावकरी व महिला उपस्थित होते