उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला: – सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे व समाज क्रांती आघाडी चे संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांच्यासोबत संघटना स्थापनेपासून संविधानाच्या रक्षणाकरिता स्वतःला वाहून घेणारे क्रांतीकारी लढा उभारून दलित बौद्ध चळवळीला गतिमान करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकातील लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळीत तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे अधिकार मिळऊन देण्यासाठी गल्ली पासुन दिल्ली पर्यंत समाज क्रांती आघाडी संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे सर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष व क्रांती करणारे समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडूदादा वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज क्रांती युवक आघाडी च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे तसेच महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकृष्ण ठोबरे, समाज क्रांती युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष उमेश सुरेश राव इंगळे यांच्या मार्गदर्शनात व समाज क्रांती आघाडी चे पदाधिकारी बाबूलालजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम रमाबाई आंबेडकर नगर येथे बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन बौद्ध वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले तसेच संजय इंगळे यांच्या वतीने मुर्तीजापुर येथील रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले व बाबूलाल डोंगरे यांच्या कार्यालयात केक कटींगचा कार्यक्रम घेण्यात आला.
त्यानंतर अमर वासनिक व शीलवंत वानखडे यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर नगर येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समाज क्रांती युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे, बाबूलालजी डोंगरे, अमर वासनिक सतीश तेलगोटे, संजय इंगळे, सुनील वानखडे, शिलवंत वानखडे, विश्वास सिरसाट, भिमराव सिरसाट, सचिन पाईकराव, उमेश सिरसाट, दर्शन शेगोकार, दादु इंगळे, विकास शेगोकार, हर्षल शेजुळ, सुरज खंडारे, सिद्धांत वानखडे, सतीश इंगळे, रोहित तायडे, इत्यादी समाज क्रांती युवक आघाडीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.