Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

कोराडी व खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राख पुन्हा कन्हान नदीत, नागपूर पित आहे दूषित पाणी?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 3, 2024
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
कोराडी व खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राख पुन्हा कन्हान नदीत, नागपूर पित आहे दूषित  पाणी?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळशापासून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. पण या आदेशाची अंमलबजावणी न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राख पुन्हा कन्हान नदीत टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाणी दूषित झाल्याने नागपुरातील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने नदी नाले प्रवाहित झाले आहे. त्यात कन्हान नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. 1 जुलैच्या दुपारी कन्हान जल शुद्धीकरण केंद्राच्या (डब्लूटीपी) जलवसाहतीच्या विहिरीजवळ नदीत ओसीडब्लू कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख पडलेली आढळली. त्यामुळे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तात्काळ खापरखेडा वीज केंद्राची राख कन्हान नदीत टाकण्यात आल्याची माहिती वरिष्ठांना दिली.

दरम्यान अधिकाऱ्यांकडून या राखेचा स्रोत शोधण्याचे काम हाती घेतले गेले. त्यात महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या वारेगाव राखेच्या तलाव आणि वारेगाव येथील खासगी राखेपासून तयार होणाऱ्या वीज उत्पादन केंद्रासाठीच्या राख साठवणूक केंद्रातून ही राख नदीत येत असल्याचे स्पष्ट दिसून आले.

या राखेमुळे नदीतील पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बघत तातडीने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही राख नदीच्या पाण्यात जाण्यापासून थांबवण्यासाठी आवश्यक उपाय करण्याची विनंती केली गेली. त्यात राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित होऊन गंभीर धोके संभावित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

सोबत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ओसीडब्लूकडूनही कन्हान जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरातही आवश्यक उपाय करण्याचे कामही हाती घेतले गेले. खबरदारी म्हणून राख आढळलेल्या जलवसाहत परिसरातील विहिरीचे पंपही थांबवण्यात आले. त्यामुळे तुर्तास कन्हान नदीतून नागरिकांना केवळ पिण्यायोग्यच पाणी मिळत आहे. सोबत येथील पाण्याची तपासणीही केली जात असल्याचे ओसीडब्लूच्या प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले आहे.

कन्हान जल शुद्धीकरण केंद्र २५ टक्के क्षमतेवरच सुरू: औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे कन्हान शुद्धीकरण केंद्र सध्या त्याच्या मूळ क्षमतेच्या दोन तृतीयांश क्षमतेनेच कार्यरत आहे. या अर्धवट पंपिंगमुळे आशी नगर झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन आणि नेहरू नगर झोनचा समावेश असलेल्या कन्हान फीडरच्या मुख्य भागातून पुरवल्या जाणाऱ्या कमांड एरियामध्ये राहणाऱ्या ग्राहकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याचे ओसीडब्लूचे म्हणणे आहे. आवश्यक दुरुस्ती व उपायानंतर हा पुरवठा पूर्ववत होणार असल्याचेही ओसीडब्लूचे म्हणणे आहे.

Tags: कन्हान नदीकोराडी व खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राखकोराडी व खापरखेडा वीज निर्मिती केंद्राची राख पुन्हा कन्हान नदीतनागपूर
Previous Post

समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडूदादा वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम.

Next Post

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना दाखला वितरणात गैरव्यवहाराच्या तक्रारी; तलाठी निलंबित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना दाखला वितरणात गैरव्यवहाराच्या तक्रारी; तलाठी निलंबित.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना दाखला वितरणात गैरव्यवहाराच्या तक्रारी; तलाठी निलंबित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In