मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- 2024 ते 2025 या वर्षाच्या नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात व्हायला अवघे दाेन दिवसच झाले असताना गडचिरोली जिल्हातील वसा गावातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे शाळेतून घरी येत असताना एका 11 वर्षीय मुलाचा भरधाव ट्रकने जाेरदार धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. ऋतुराज प्रशांत शिवणकर वय 11 वर्ष असे जागीच ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे
मृतक ऋतुराज गावापासून 1 किमी अंतरावरच्या असलेल्या दुसऱ्या गावातील शाळेत गेला. संपूर्ण दिवस शाळेत घालविला. सायंकाळी सुटी झाली व गावातीलच एका मित्रासाेबत एकाच सायकलवर बसून गावाकडे निघाला. गावालगत पाेहाेचला खरा; पण नियतीला काही वेगळेच मान्य असावे. मागील बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रकने जाेरदार धडक दिली. यात चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवार 3 जुलै राेजी तालुक्याच्या वसा येथे घडली.
1 जुलै पासून 2024 – 25 या नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. मृतक ऋतुराज हा पहिल्या दिवशी पासूनच वसा जवळच्या पाेर्ला येथील शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत जाऊन अवघे दाेनच दिवस उलटले हाेते. गप्पागाेष्टीत शाळेतील तिसराही दिवस संपला. सायंकाळी सुटी झाल्यानंतर एका मित्रासाेबत ताे स्वत: सायकल चालवत गावाकडे निघाला. पाेर्लापासून अवघ्या एका किमी अंतरावर गडचिराेली-आरमाेरी राष्ट्रीय महामार्गावर त्याचे गाव. गावाच्या फाट्याजवळ पाेहाेचला. आता गावाच्या रस्त्याने सायकल वळवणार ताेच गडचिराेलीकडून आरमाेरीकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने मागील बाजूने सायकलला धडक दिली. यात त्याचा मित्र बाजूला फेकला गेला तर ऋतुराज हा ट्रकच्या चाकाखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पाेहाेचताच गर्दी उसळली. लगेच पाेलिसांनाही कळविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदविण्याची प्रकिया सुरू हाेती.
एकुलता एक मुलाच्या मृत्यूने…
प्रशांत शिवणकर यांना ऋतुराज हा एक मुलगा हाेता व त्यापेक्षा लहान मुलगी आहे. आपल्या मुलाला ट्रकने चिरडल्याची माहिती हाेताच शिवणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलत्या मुलाच्या जाण्याने नातेवाइकांच्याही अश्रूंचा बांध फुटला. तर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.