अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक इनरव्हिल क्लब द्वारे क्लब च्या १९ व्या वर्धापन दिवसा निमित्य व कृषी दिना निमित्य इनरव्हिल क्लबच्या माजी अध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
इनरव्हील क्लब ऑफ हिंगणघाट दरवर्षी स्थापना दिवस साजरा करीत असतात. या निमित्य वेग वेगळे कार्यक्रम साजरा करीत असतात. यावर्षीही माजी अध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा करण्यात आला. इनरव्हिलक्लब ऑफ हिंगणघाट द्वारे विरांगणा दुर्गावती सभागृह परिसरामध्ये 21 वृक्ष लावून कृषी दिन साजरा करण्यात आला.
हिंगणघाट नगरीमध्ये इनरव्हील क्लब ची स्थापना होऊन 19 वर्षे झालेली आहेत. 19 वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याने आज एका वटवृक्षाचे रुप धारण केलेले आहे. इनरव्हील क्लबच्या प्रत्येक अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळामध्ये उत्कृष्ट कार्य करून इनरव्हील क्लब नावारूपाला आणले आहे. प्रत्येक अध्यक्षांनी त्यांच्या कार्य काळामध्ये केलेल्या समाज उपयोगी कार्याला मानाचा मुजरा देत, इनरव्हील क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. रुपल कोठारी यांनी प्रत्येक अध्यक्षाच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांच्या कार्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. पर्यावरणाचा झालेल्या र्हासामुळे दरवर्षी उष्णता वाढत आहे. आणि याचा विचार करून यावेळी २१ वृक्षा चे रोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.