Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आता खरी गरज आहे राकेशला ऍनिमल एबूलन्सची, शासकीय यंत्रणेची अनावस्था, वन्यजीव रेस्क्यू टीमला आला असाही अनुभव.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 4, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
आता खरी गरज आहे राकेशला ऍनिमल एबूलन्सची, शासकीय यंत्रणेची अनावस्था, वन्यजीव रेस्क्यू टीमला आला असाही अनुभव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गाईला वाचवायच की आपला जीव अशा संभ्रमावस्थेत असलेल्या वन्यजीवरक्षणाचे कंकण हाती बांधलेल्या चमूला माणसांच्या स्वभावाचे वेगवेगळे नमुने आढळले. वन्यजीवरक्षक राकेश झाडें यांनी दिलेल्या वृत्तानुसार,

दिनांक 2 जुलै 2024 नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून एक परिवार स्वतःच्या वाहनाने जात असतांना त्यांना हिंगणघाट येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड समोरील पुलावर कोणत्यातरी अज्ञात वाहनाने जखमी झालेली एक गौ-माता रस्त्यावर मधोमध पडून दिसली. त्यांनी त्या गाई समोर गाडी थांबवली व गाडीतून खाली उतरून ती गाय जिवंत आहे हे त्यांनी बघितले. लगेच त्यां अनोळखी परिवाराने त्यां गौ -मातेला मदत करण्याचे ठरविले. परंतु अनोळखी परिसर व गाव. फोन कोणाला करावा? त्यांनी लगेच गुगलवर सर्च करून हिंगणघाट शहरात प्राण्यांविषयी कोण काम करते हे टाकले. त्यांना जीवरक्षक फाउंडेशन विषयी माहिती मिळाली. त्यांनी लगेच जीवरक्षक फाउंडेशनचे राकेश झाडें सोबत मोबाईल वर संपर्क केला व त्यां फोनच्या आधारे त्या ठिकाणी राकेश आपली दुचाकी एबूलन्स घेऊन लगेच दाखल झाला. त्या जखमी गायीला या वन्यरक्षकांच्या ताब्यात देऊन त्यानंतर तो परिवार निघून गेला.

मग काय तर रेस्क्यू टीम समोर मोठा प्रश्न पडला की राष्ट्रीय महामार्गावर स्वतःच्या जीव वाचवायचा की गाईचा ? कारण गाय रस्त्याच्या मधोमध आणि आजूबाजूने भरधाव वेगाने वाहने सुरू होती. वाहनांना एका बाजूला करण्यासाठी कुठलीही शासकीय यंत्रणा मदतीला नाही. रस्त्याच्या मधोमध दुचाकी ॲनिमल ॲम्बुलन्स उभी करून मोबाईलच्या लाईटच्या साह्याने वाहतूक एका बाजूस वळवली. काही वेळाने त्याच ठिकाणा वरून एक पोलिसांची गाडी सुद्धा गेली. परंतु पाहिलं न पाहिलं असं करून ते परंतु ते एक मिनिट सुद्धा थांबता सरळ महामार्गाने निघून गेले.

काही वेळाने लगेच राष्ट्रीय महामार्गावर गस्त करण्याची जबाबदारी असलेले राष्ट्रीय महामार्ग पोलिसांची गाडी आली. जखमी गाय व तिला वाचविण्यासाठी धडपड करणारा राकेश झाडें याच्या कडे पहात तेही भरवेगाने निघून गेली. ते आमच्या मदतीला धावून आले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्गावर कुठलेही आपत्तीजनक घटना घडल्यास मूळ काम हे एन एच ए आय ह्याच सरकारी यंत्रणेचे आहे. त्यांना शासनाने याच कामासाठी नेमलेले आहे. परंतु त्यांनी या प्रकाराकडे चक्क दुर्लक्ष करून कोणतीही चौकशी न करता निघून गेले.

अखेर तेथील आसपासच्या परिसरातील काही लोकांना मदतीसाठी बोलावून गाईला गाडीमध्ये टाकून पुढील उपचारासाठी रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले. केवळ मुक्या जीवाप्रती असलेल्या कारुण्याने निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या राकेश झाडें यांच्या मदतीला सदरक्षणाय खलनिग्रणाय असे बिरूद मिरविणाऱ्या दोन पैकी एकही पोलीस दलाचे जवान थांबले तर नाहीच पण साधी चौकशीसुद्धा केली नाही हे विशेष!

रात्री-अपरात्री महामार्गावर मुक्या जीवाच्या मदतीला धावून जाणाऱ्या या देवदूताच्या या तपश्चर्येला आलेलं हे फळं समजावं कां? ज्यांच्या वर जीवितांच्या रक्षणाची जबाबदारी आहेत ते ते निष्काळजीपणे वागतात तर दुसरीकडे हैद्राबादला जाणाऱ्या त्यां अज्ञात परिवाराला महामार्गवर जखमी अवस्थेत भररस्त्यावर पडून असलेल्या गाईच्या जीवाची वां तिच्या मुळे अन्य वाहन अपघातग्रस्त होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी त्यां मार्गावर थांबून गुगल सर्च करून या गावात मुक्या जीवासाठी कोण काम करतो याची माहिती घेऊन, केवळ माहिती घेऊनच नाही तर त्यां नंबरवर कॉल करून राकेश आपल्या दुचाकी ऍम्ब्युलन्सने पोहचेपर्यंत त्याची वाट बघत थांबणारे तो अनाम प्रवाशी कुठे अन जबाबदारी झटकून आपण त्यां गावचेच नाही ह्या भूमिकेतील आमची पोलीस यंत्रणा कुठे?

असो! शेवटी ह्या जिद्दी पोराने स्वबळावर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने किरायाने चारचाकी मालवाहू वाहन बोलावून त्या जखमी गौ-मातेला आपल्या प्राणी निवारा केंद्रात नेऊन तिच्यावर विनामूल्य उपचार करणाऱ्या ह्या मुलखा वेगळ्या धाडशी युवकाला शत शत नमन :

परंतु त्याच्या ह्या कार्यासाठी त्याला प्राण्याच्या हायड्रोलीक ऍम्ब्युलन्सची खरी गरज आहे. येथील आमदार – खासदारानी त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याला शासकीय निधीतून ऍम्ब्युलन्स घेऊन दिल्यास त्याच्यावर नव्हे तर त्यां अनाम मुक्या जीवावर उपकार होतील.

Tags: वन्यजीवरक्षक राकेश झाडेंहिंगणघाट
Previous Post

हिंगणघाट: इनरव्हिल क्लबच्या वतीने 19 व्या वर्धापन दिन व कृषी दिना निमित्य वृक्षारोपण.

Next Post

हाथरस मधील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या भाविकांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ने वाहिली श्रद्धांजली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हाथरस मधील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या भाविकांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ने वाहिली श्रद्धांजली.

हाथरस मधील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या भाविकांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ने वाहिली श्रद्धांजली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In