मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- दिनांक १ जुलै रोजी डॉक्टर दिवस, सी.ए. दिवस व कृषी दिवसाचे औचित्य साधून नारायण सेवा मित्र परिवार व इंडियन मेडिकल असोसिएशन चे संयुक्त विद्यमाने ‘सेवे चा सत्कार ‘ व “वृक्षारोपण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक शास्त्री वॉर्ड मधील बालाजी दाल मिल मागील प्रागणात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. वसंत बोंडे, डॉ. अविनाश खिळेकर, आय.एम.ए. अध्यक्ष, हिंगणघाट सी.ए. श्याम करवा, कृषी तज्ञ प्रा.भाऊसाहेब मुडे, पारस मुनोत समाजसेवी,विजय धात्रक, पंतजली परिवार, अभीनव विचार मंच हिंगणघाट, महेश अग्रवाल अध्यक्ष नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते शहरातील डॉक्टर्स, सी.ए. व कृषी तज्ञांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. गायत्री परिवार ने वृक्ष पूजन करून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी आमदार डॉ. आंबटकर यांनी येत्या काळात मोठ्या संख्येने वृक्ष लागवड न झाल्यास तसेच वृक्षतोडीला आळा न बसल्यास मानव जातीला भविष्यात भीषण समस्येला तोंड द्यावे लागेल. असे मनोगत व्यक्त करून सत्कारमूर्तींना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष शेंडे तर संचालन पराग मुडे यांनी केले. उपस्थितांचे आभार सुभाष ललवाणी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजना करताना नारायण सेवा मित्र परिवार तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन चे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.