उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला दि.7:- महात्मा फुले बुध्द विहार, महात्मा फुले नगर, कैलास टेकडी,अकोला येथे भव्य आरोग्य तपासणी शिबीर आरोग्यदूत ऑर्गनायझेशन च्या वतीने आयोजीत करण्यात आले होते. या कार्यकर्माचे आयोजक सुरेखा वाहने मॅडम, पुजा खंडारे मॅडम, किशनराव वाकोडे, समाधान खंडारे, उषा पचांग मॅडम, आरती सावळे मॅडम यानी केले होते. या कार्यक्रमात प्रमुख तज्ञ डॉक्टर अश्विन पुंडकर, डॉ सतिश विरवाणी, डॉ. प्रशांत जानोळकर, डॉ. राम बुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबीर मध्ये २५० ते ३०० लोकाना लाभ मिळाला त्याचप्रमाणे १५० लोकांचे रक्त तपासणी करण्यात आले. रक्ततपासणी करीता प्रफुल्ल मनवर सर प्रिया मनवर व वैशाली दारोकार यांनी केली.सर्व सामान्य जनतेला आरोग्य शिबिराचा लाभ मिळाला. औषधी सामाजिक कार्यकर्ते प्रदिपजी भिमकर सर यांनी मोलाची मदत केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
आरोग्यदुत ऑर्गनायझेशन च्या वतीने गोरगरीब नागरीकासाठी नेहमी असे मोफत शिबीर राबविण्यात येतात, भविष्यात अश्या शिबिरात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा. असे आवाहन आरोग्यदुत ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल धनधर व जिल्हा अध्यक्ष कुणाल दारोकार यांनी केले आहे.