मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथील प्रस्तावित मेडिकल कॉलेज कारण नसतांना केवळ स्वतःच्या प्रतिष्टेसाठी आमदार समीर कुणावर व त्यांचे कथीत हितचिंतक चिघळवित आहे हे चर्चा वरून दिसून येत आहे. कारण नसतांना वेळा येथील जागा समोर आणण्यात आली. मग ती जागा वादग्रस्त असल्याचे आढळून येताच प्रकरण अंगावर शेकत आहे हे लक्षात येताच दानदात्याने दिलेले दानपत्र वापस घेतले.
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे शासकीय जागा उपलब्ध असतांना व ती सर्व जागा महाराष्ट्र शासनाचे नावाने असतांना विनाकारण सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, पोलीस परेड मैदान व शाळा यासाठी आरक्षित करून ठेवले. यावरही समाधान न झाल्याने आमदार समीर कुणावर यांनी एक पत्र तहसीलदार यांना पाठवून, 400 खाटाच्या जिल्हा रुग्णालया करिता कर्मचारी निवास स्थान व 100 खाटाच्या स्त्री रुग्णालया साठी इमारत बांधकाम व कर्मचारी निवासस्थान याकरिता भूमापन क्रमांक 185, 194, व 195 ची दहा एकर जागेची मागणी केलेली आहे.अशी माहिती सुत्रान कडून मिळाली आहे.
हा सर्व जागा अडवून ठेवण्याचा उपदव्याप केवळ उपजिल्हा रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध नाही हे दाखविण्या चा प्रकार आहे. कारण काहिही करून वेळा येथेच व दान स्वरूपात मिळालेल्या जागेवरच आमदार समीर कुणावर यांना मेडिकल कॉलेज पाहिजे आहे. या मागचे कारण कळण्या इतपत जनता मूर्ख नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा मध्ये वेळा हिगणघाट अंतर हे 12 किमी असल्याचे बोलले त्यावर आमदार समीर कुणावर यांनी जयंत पाटील यांना खोटे ठरवून स्वतःच खोटे अंतर सांगितले. परंतु हे अंतर 14 की मि असल्याचे डेपो मॅनेजरच्या पत्रा वरून दिसून येते. हा आमदार समीर कुणावर यांचा खोटारडे पणा पुन्हा सप्रमाण सिद्ध झालेला आहे.
आमदार समीर कुणावर यांचा हीतचितक ज्या प्रमाणे खोटं बोल पण रेटून बोल या पद्दतीने समाज माध्यमावर वर व्यक्त होत आहे त्यातून सामान्य जनतेचे मनोरंजन होत आहे. काहीही असो आमदार समीर कुणावर मेडिकल कॉलेज हिंगणघाट येथे आणण्या पेक्षा वेळा येथे नेऊन आपल्या उद्योजक मित्रांना मदत करायची आहे हे लपून राहिलेले नाही. खोटं बोला आपल्या नेत्यांची बाजुही मांडा पण पचेल एवढ्याच थापा मारा. अशी सर्वत्र जनतेकडून बोलले जात आहे.