बिनबुडाचे आरोप चुकीचे, पत्रपरिषदेत केले आरोप प्रत्यारोप
युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले यांच्यावर काही समाज कंटाकांकडून वेगवेगळे बिनबुडाचे निराधार आरोप करून कलावंतामध्ये तेढ निर्माण करण्याचे कुटील कारस्थान करताहेत.ज्याचा कलेशी तीळमात्र समंध नाही, स्वतःच्या कलावंत संघटना काढून गोरगरीब कलावंतांना मासिक मानधन मिळवून देण्याचे आमिष देत लुबाडणाऱ्यावर काही पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
लोककला मंडळातुन बाबाराव दुपारे, निशा खडसे, विकाम शेंडे, राजेंद्र बावनकुळे, प्रकाश काळे यांना काही महिन्याआधी निष्काशीत करण्यात आले आहे. दुपारे व खडसे यांनी गरीब व गरजू लोककलावणताना गाठून शासकीय मानधन मिळवून देण्याच्या प्रलोभनातून प्रचंड मोठी लूट केल्याचा पुराव्याणीशी प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. घुले यांनी यांच्यावर कारवाई करत मंडळातुन हकालपट्टी केली होती. तेव्हा पासून या महाभागांणी राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून राष्ट्रीय अध्यक्ष घुले यांच्यावर बिनबुडाचे आरोप घेतले. ज्याचा कलेशी, कलावंताशी कसलाही संबंध नाही ते स्वतःला कलावंत म्हणवून स्वतःच्या वेगळ्या कलावंत संघटना काढून गोरगरीब कलावंतांना लुबाडणाऱ्यांवार जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, आणि हेच लोक आता स्वच्छ प्रतिमेचे अत्यंत निर्मळ स्वभावाचे कसल्याही प्रकारचा लोभ नसलेले लोककलासेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वृद्ध मानधन समितीचे महाराष्ट्र शासनाचे नागपुर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी समाजामध्ये करीत आहेत. काही प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित करून प्रा. घुले यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे बाबाराव दुपारे, निशा खडसे करीत आहेत असे कळमेश्वर येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रपरिषदेत प्रमोद बागडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष लोककला सेवामंडळ यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रा. घुले हे शासनाच्या मानधन समितीचे अध्यक्ष आहेत. जे खरे कलावंत आहेत त्यांच्या साठी शासनाचे निःस्वार्थ मानधन मंजूर करण्यासाठी धडपड करतात. काही दिवसांपूर्वी प्रा. घुले यांच्या विरोधात पत्रपरिषद घेऊन बिन बुडाचे तथ्यहीन आरोप केले आहेत. त्यासर्व आरोपाचे आम्ही खंडन करित आहोत आणि बाबाराव दुवारे, निशा खडसे यांच्यावर कायदेशीररित्या कार्रवाई करणार आहोत असे यावेळी प्रमोद बागडे यांनी सांगितले.
सदर पत्रपरिषदेला लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाहीर माणिकराव देशमुख, सचिव शाहीर वेंकट गजभिये, सदस्य वासुदेव वाकोडे, ज्ञानेश्वर गावंडे, मंजुषा बनकर, वरून डहाके, गौरीशंकर गजभिये, पुरुषोत्तम डांगोरे, जयश्री कौटकर, सुनीता काळे, वंदना कोहळे, कीर्तनकार माधुरी घोरमाडे, प्रशांत गुळादे, विदर्भ सचिव रवींद्र भक्ते,माधुरी पाटील, भगवान वानखेडे, पुरुषोत्तम कोंभे, मीना धरममाळी, मारुती मुसळे, कविता चौधरी, राजू टापरे, जयश्री धोटे, रंगनाथ बोरीकर, संगीता दिघोरे, रंजना कुंभलकर आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.