युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
9923296442
वर्धा :- पुरामुळे अनेक रस्त्यावर मोठाले गड्डे पडलेले आहेत खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेकांच्या वाहनाचे नुकसान होत आहे. असाच प्रसंग ढगा येथे ब्राह्मणवाडा मार्गावरील पुलावर घडल्याने दिसून आले. खड्ड्यात अडकलेले वाहन दुराने बांधून ठेवले होते मात्र धाम नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहन वाहून गेल्याने दुसऱ्या दिवशी 17 रोजी जेसीबीच्या साह्याने पुरात अडकलेले वाहन नदीपात्रा बाहेर काढण्यात आले.
वर्ध्यातील ढगा ते ब्राह्मणवाडा मार्गावर ढगा भावना जवळ धाम नदीच्या पुलावरून थोडं पाणी वाहत होते चालकाने वाहन पुढे नेले व पुलावरून असलेल्या खड्ड्यात वाहनाचे चाक अडकल्याने वाहन जागीच थांबले वाहनात बसलेले पाचही जण वाहना बाहेर येत वाहन काढण्यासाठी प्रयत्न करू लागले मात्र त्यांना यश आले नाही. त्यांनी सदर वाहन दोराच्या साह्याने पुलाच्या काठड्याला बांधून ठेवले आणि दुसऱ्या वाहनाला आणण्यासाठी गेले मात्र काही वेळानंतर परिसरात पाऊस झाल्याने पुलावरून आलेल्या पुराने अडकलेले वाहन फुलाच्या खाली कोसळले व दुसरे वाहन मदतीसाठी घेऊन येईपर्यंत पुलावरून अडकलेले वाहन पुरात वाहून गेले.
दुसऱ्या दिवशी नदीतील पाणी कमी झाल्यानंतर हे वाहन दिसून आले जेसीबीच्या साह्याने वाहन पाण्याबाहेर काढण्यात आले यात वाहन मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर खड्डे तात्काळ बुजवीण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.