हिंगणघाट कृषी अधिकारी सचिन सुतार यांची पाच दिवसाच्या आत तात्काळ बदली करा: अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा.कॉ.पार्टी
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार यांच्या मनमानी कारभारामुळे सहाय्यक कर्मचारी वर्ग गेल्या पाच दिवसापासून वर्धेत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करीत आहे. या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी भेट दिली. त्यांची सर्व मागणी ऐकून जिल्हा कृषी अधिकारी यांना भेटून पाच दिवसाच्या आत त्या मनमानी करणाऱ्या कृषी अधिकारी सचिन सुतार यांची बदली करा अन्यथा कठोर पाऊले उचलू नंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार जिल्हा कृषी अधिकारी राहील असे निवेदन देण्यात आले.
कृषी अधिकारी सचिन सुतार सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये शेतकर्याचे अनुदान काढत असताना सहाय्यक कृषी अधिकारी यांना त्या शेतकऱ्या कडून पैसे आणून द्या, नाही तर त्याचे अनुदान कमी काढा अशी तंबी देतात व शेतकऱ्याची फाईल मुद्दाम थांबवतात. विविध प्रकारचे योजनेचे देयके कमिशन करीता सहा-सहा महीने राखुन ठेवतात व देयका मध्ये वारंवार त्रुट्या लावून परत करतात. त्या त्रुटया दुरुस्त करण्यात कर्मचाऱ्याचा वेळ निघुन जातो व ईतर योजनेचे कामे मागे पडत आहे. कर्मचाऱ्या सोबत अपमानास्पद व अर्वाच्य भाषाचा वापर करतात व महिलां वर व्यक्तिक तसेच विनाकारण आरोप करतात. कार्यालयात कार्यालयीन कर्मचारी जसे की लिपिक वर्गीय व ईतर यांना सुद्धा सतत अपमानास्पद वागणूक देतात व त्यांना तात्रिक कामे देउन काम करण्याचा दबाव आणतात. त्यामुळे सर्व कर्मचारी धास्तावलेले आहेत. वारंवार अपमानास्पद बोलल्यामुळे स्थानीय कामावर विपरीत परिणाम होतो. संबंधित कर्मचारी यांचे पूर्व नियोजित कामे पुढे ढकलली जाते. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोषाचे वातावरण तयार होऊन शेतकरी व कर्मचारी यांच्यात दुरावा होऊन पुढील कामासाठी शेतकऱ्याला बोलावले असता ते प्रतिसाद देत नाहीत.
वरिल सर्व कारणांमुळे सर्व कार्यालीन कर्मचारी व क्षेत्रीय कर्मचारी यांचे मानसिक संतुलन खालावत चालले आहे. त्यामुळे कृषी अधिकारी सचिन सुतार यांची पाच दिवसाच्या आत हिंगणघाट येथुन बदली करा अन्यथा कठोर पाऊले उचलू असे निवेदन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहे. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, नितीन भुते उपस्थित होते.