प्राथमिक आरोग्य पथकाचे अधिकारी डॉ. राजेंद्र मानकर यांनी गावातील नागरिकांना केले मोलाचे मार्गदर्शन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील गोलाकर्जी आणि मरणेली या दोन गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न करण्यात आले आहे.आम्ही आमच्या आरोग्यासाठी प्रत्येक गावात जाऊन आरोग्य विषयक प्रसार आणि प्रचार करताना. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापुर राजाराम यांचे सयुक्त विद्यमाने उपक्रम घेण्यात आले आहे. यामध्ये ब्लड प्रेशर, शुगर, रक्तक्षय तपासणी, ताप, खोकला, खाज, चक्कर येणे,अशक्तपणा, हातापाय दुखणे, खरूज, असे विविध रुग्णाची तपासणी करून ओषध उपचार करण्यात आले आहे.
या आरोग्य तपासणी शिबिराला डॉ. राजेश मानकर, डॉ. नैताम तसेच त्यांचे कमलापुर राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्राचे संपूर्ण टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये डॉ. मानकर यांनी साथीचे आजार, मलेरिया, खाज, खरूज, सर्प दंश यापासून बचाव करायचां असेल तर नेहमी मछर दानीचां वापर करा असा संदेश दिला पावसाळ्यात पिण्याचे पाणी गरम करून पिण्याचा सल्ला दिला. तसेच सर्पदश झाल्यास देव धर्माकडे न जाता दवाखण्यात रुग्णाला न्यावे असा संदेश त्यांनी या वेळेस गावकऱ्यांना दिला. यावेळी प्रकल्प समन्वयक रजनी चौधरी यांनी आहारात हिरव्या पालभाज्यांचे, राणभाजीचे सेवनाने रक्तलप्ता हा आजार दूर करु शकतो असा मोलाचे मार्गदर्शन त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता हरिदास कांबळे, आनंदराव तेलसे, संतोष पोरतेट, अरुण चालुरकर, प्रकाश सिडाम, दिपा गावडे आम्ही आमच्या आरोग्य संस्थेचे पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले व गावातील महिला व पुरुष, बालक मोठया संख्येने उपस्थित होते.

