रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- परतूर पोलिसांची धडक कारवाई, 5 लाखाचा अवैध दारू साठ्यासह वाहतूक करणारा बोलेरो पिकअप गाडी पकडली त्यात तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून लाखोंचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध दारूची तस्करी करणाऱ्या लोकांचे चांगलेच धागे दणाणले आहे.
परतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परतूर ते आष्टी रोडवर स्वतः चे फायदाया साठी अवैध दारू विक्री करन्यासाठी इंग्लिश दारूची वाहतूक करताना पिक अप टेम्पो मध्ये अवैध दारू घेऊन जात असताना मिळून आला असून सदर टेम्पोमध्ये 1) इम्प्रियल ब्लू व्हिस्की कंपनीचे दारूचे दहा बॉक्स किंमत 76,800 रुपये 2) रॉयल चॅलेंज व्हिस्की कंपनीचे दारूची दहा बॉक्स किंमत 86,400 रुपये 3) रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीचे दारूचे 50 बॉक्स किंमत 43,2000 रुपये 4) महिंद्रा पिक अप MH 23 W1753 किंमत 500000 रुपये असा एकूण -10,95,200 रुपयेचा मुद्देमाल मिळून आला
त्यात दारूचा अवैध वाहतूक करणारा आरोपी 1) ईश्वर नारायण वाघमारे वय 28 वर्ष रा. गुरु पिंपरी. ता. (चालक) घनसावंगी तसेच त्याचा मालक 2) संभाजी कोल्हे रा. गुरु पिंपरी ता. घनसावंगी 3) रामशेठ अग्रवाल रुपम वाइन शॉप चे मालक रा. जालना याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, पोलीस आमलदार दीपक आडे, ज्ञानेश्वर वाघ, अच्युत चव्हाण, सतीश जाधव, चालक धोत्रे अशी यांनी कार्यवाही केलेली आहे.