आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांचा आज हिंगणघाट दौरा नियोजित होता त्यादरम्यान GMC संरक्षण समिती वेळा यांच्या वतीने वर्धा जिल्हात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथेच व्हावे या मागणीला घेऊन निवेदन सादर केले.
वेळा गावातील आणि परिसरातील सर्व नागरिकांनी शासकीय मेडिकल कॉलेज वेळा येथेच करण्यात यावं या मागणीला घेऊन खासदार अमर काळे यांनी वेळा बस स्टॉप येथे आपली गाडी थांबवून समिती सोबत चर्चा करून विषय समजून घेतला व मी सकारात्मकपणे भूमिका घेऊन प्रस्तावित वेळाची जागा व त्या व्यतिरिक्त सुचवण्यात आलेल्या जागांची पाहणी करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रलंबित विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वेळा येथेच प्रस्तावित जागे व्हावं याकरिता खासदार वर्धा लोकसभा यांना निवेदन देण्यात आले.

