:: मुख्य मुद्दे ::
नागपुरातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सुप्रिया ढोके यांनी केलं या चित्रपटाचे कॉस्ट्यूम डिझाईन.
नितिन मनोहरे तसेच संपूर्ण चित्रपटाची टीम घेत आहे यशवंत चित्रपटाच्या प्रमोशन साठी मेहनत.
प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री स्मिता तांबे, टीवी अभिनेता आदित्य हलबे तसेच नवोदित अभिनेता नितिन मनोहरे तर बाल कलाकार धैर्य आजनकर आणि रुहिका वडवाले हे चित्रपटातील प्रमुख भूमिकेत दिसणार.
✒️प्रशांत जगताप, प्रतिनिधी
नागपूर:- बहुप्रतिक्षित यशवंत या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकतेच प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षकाचा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बघण्याची उत्सुकता सर्व रसिकांना लागली आहे.
विदर्भातील अवलिया संत श्री यशवंत माऊली यांच्या जीवन कार्यावर आधारित यशवंत या मराठी चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री स्मिता तांबे, आदित्य हलबे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. संत यशवंत माऊली याची भूमिका वरूड येथील नितीन मनोहरे यांनी साकारली आहे. या चित्रपटात जवळपास 120 कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहे. या चित्रपटाची कथा अजय देशपांडे यांनी लिहिली असून दिग्दर्शन पियूष विजय यांनी केले.
नितिन मनोहरे यांनी साकारली यशवंत बाबाची भूमिका.
यशवंत चित्रपटात मुख्य भूमिकेतील नवोदित अभिनेता नितिन अरुण मनोहरे हे अमरावती वरुड येथिल प्रसिध्द कोरियोग्राफर असून अभिनेता म्हणून हा त्यांचा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. नितिन यांची सुरुवात 2010 पासून झालेली आणि तब्बल 11वर्षाच्या अथक परिश्रमा नंतर त्यांना अभिनय क्षेत्रात मुख्य भूमिके साठी संधि मिळाली. या चित्रपटासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली यशवंत बाबा ची हुबेहुब भूमिका साकारता यावी यासाठी अभिनेता नितिन मनोहरे ह्यानी काही दिवस यशवंत बाबाच्या मठात देखील जाऊन अभ्यास केला आणि त्याचेच जिवंत दर्शन येत्या 26 सप्टेंबर ला रसिक प्रेक्षकांना चित्रपट गृहात अनुभवता येईल.नितिन मनोहरे हे भविष्यात आता अभिनेता म्हणून देखील ओळखले जातील याची हमी चित्रपटाचा ट्रेलर बघुन आपल्याला जाणवते.
सुप्रिया ढोके यांनी केलं कॉस्ट्यूम डिझाईन.
नागपूरची मराठमोळी फॅशन डिझायनर सुप्रिया ढोके यांचा हा सहावा चित्रपट असून त्यांनी या चित्रपटात कॉस्ट्यूम डायरेक्टर आणि डिजायनर म्हणून काम केल आहे. ‘यशवंत’ या मराठी चित्रपटाची प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्मिता तांबे यांनी सुप्रिया ढोके त्यांच कॉस्ट्यूम डिझाईन बद्दल मोठ कौतुक केलं. तसेच मकरंद अनासपुरे यांनी सुंदर मार्गदर्शन केलय, या चित्रपटासाठी सुप्रिया यांनी 120 कलाकाराचे कॉस्ट्यूम डिझाईन केले. या चित्रपटाच्या कॉस्ट्यूमसाठी त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली असून त्यांची केलेली मेहनत ही खरोखर कैतुकास्पद आहे.
सुप्रिया ढोके यांनी आजपर्यंत अनेक हिंदी, मराठी साँग चित्रपट तसेच नुकतेच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कारासाठी गेलेल्या “पोटरा” या मराठी चित्रपटासाठी सुद्धा कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. त्यावेळी त्याच्या कॉस्ट्यूमची मोठी चर्चा झाली होती. चित्रपटांबरोबरच फॅशन डिझायनर म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी सुप्रिया ‘यशवंत’च्या निमित्ताने पुन्हा आपल्या कॉस्ट्यूमची जादू दाखवायला सुसज्य आहे. ‘यशवंत’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रथमच तिला मराठी फिल्म सृष्टीतले दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरे आणि प्रसिध्द अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या बरोबर काम करायला मिळालं.यासाठी ती डायरेक्टर पीयूष विजय यांचे आभार मानते.
गेली अनेक वर्षे एका मोठ्या कलात्मक, नियतकालिक चित्रपटात कॉस्ट्यूम डिझाईन करण्याचे स्वप्न सुप्रिया ढोके यांनी उराशी बाळगले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले गेले असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
सुप्रिया ढोके यांनी एक प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिजाइनर म्हणून आपल नाव मेहनतीने आणि जिद्दिनी काम करून झळकावल आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि अल्बम सॉंग तसेच चित्रपट क्षेत्रा बरोबरच फॅशन फोटोग्राफी करता ही काम केले आहे.
यशवंत हा चित्रपट तीन टप्प्यात प्रदर्शित केला जाणार असून येत्या 26 सप्टेम्बर ला संपूर्ण अमरावतीत प्रथम बघावयास मिळणार आहे. त्यानंरच्या टप्प्या टप्प्याने संपूर्ण राज्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे.