विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज एटापल्ली:- तालुका हा नक्षलग्रस्त भाग असून मोठ्या प्रमाणात जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून खनिज संपदाची तस्करी जोमात सुरू आहे. अशाच एका अवैध अवैध उत्खनन करणाऱ्या तस्करावर वन विभागाने धडक कारवाई करत जेसीबी जप्त केला आहे.
देवदा- हालवारा रस्त्याच्या कडेने अवैध उत्खनन करतांना दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास वनरक्षक व वनपाल गस्तीवर असतांना निदर्शनास आले व लगेच वनरक्षक नैताम व वनपाल पुंगाटी ह्यांनी खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली ह्यांना अवैध उत्खनन होत असल्याची खबर तातडीने दिली व लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली श्रीमती खोब्रागडे ह्यांनी वनविभागाची चमू घेऊन घटनास्थळी दाखल झाले व जेसीबी क्रमांक सी. जी. 17 के.टी. 3604 आर. के. कंट्रक्शन धानोरा ह्याचा वाहन ताब्यात घेतला व जप्त करून पंचनामा व पी. ओ. आर. करून परिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथे ठेवण्यात आला आहे.
वन विभागाने केल्याला कारवाई मुळे अनेक अवैध उत्खनन करणाऱ्या लोकात दहशत पसरली आहे. ह्या धाडसी कार्यवाही मुळे वनपरिक्षेत्र अधिकारी खोब्रागडे यांचे परिसरात कौतुक होत आहे.