संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांना परिसरातील विविध नागरिक सेवा केंद्र, कार्यालयाकडून होणाऱ्या कार्याची माहिती मिळावी म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्ग ५ वी सीबीएसई विद्यार्थ्यांनी राजुरा नगर परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सरदार पटेल वाचनालय आणि वर्ग ८ वी सीबीएसई च्या विद्यार्थ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा येथे भेट देऊन येथील कार्यप्रणाली विषयी माहिती देण्यात आली.
आधुनिक युगात बँकिंगची माहिती मिळावी व त्यांचा व्यवहार कळावा तसेच सार्वजनिक वाचनालयाविषयी माहिती मिळावी या हेतूने या दोन स्थळाला भेटी देऊन माहिती देण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सरदार पटेल वाचनालयाचे ग्रंथपाल श्री मयूर मोटावरे यांनी मदत केली. बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा येथील शाखाप्रमुख रमेश नायर व उपशाखाप्रमुख अक्षय चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्व बँकेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
विविध स्थळाला क्षेत्रीय भेट द्यावी ही कल्पना शाळेचे संचालक अभिजीत धोटे यांची होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक शिक्षक सुभाष पिंपळकर, श्रीनिवास, विद्या चौधरी , वैशाली धानोरकर यांनी विशेष सहकार्य केले.