अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यां मध्ये नैसर्गिक संसाधने यांचे जतन आणि पर्यावरण संवर्धनासाठी जाणीवजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने इको क्लब फॉर मिशन लाइफ (हरीतसेना) अंतर्गत डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य डॉ. चंद्रकांत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्यात निसर्ग फेरीचे आयोजन करून प्रत्यक्षात शाळा परीसरात वृक्षा रोपन करण्यात आले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षा रोपणाचे किती महत्त्व आहे, हे समजावून सांगितले. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची छोटी छोटी रोपटे आणून सुंदर अशी परसबाग तयार केली. सहभागी विद्यार्थ्यांना परसबागेचे महत्व आणि ओल्या कचऱ्यापासून खत कसे निर्माण करावयाचे याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्यात इ कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा परीणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळा परीसरात ई कचरा संकलन केंद्र तयार करण्यात आले. चौथ्या टप्यात शाळा परीसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पाचव्या, सहाव्या आणि सातव्य टप्यात अक्षय उर्जा बचतीवर, पाणी बचतीवर आणि दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे या विषयावर व्याख्यान आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शेवटी वृक्ष माझा मित्र, एक वृक्ष आईच्या नावाने या थीम अंतर्गत प्रत्यक्ष वृक्षा रोपन, वृक्षा रोपनावर मार्गदर्शन, वृक्षा रोपणावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाच्या आयोजनासाठी हरित सेनेचे प्रमुख गोपाल मांडवकर, दिनेश वाघ, पपेश मुंजेवार, आशिष हाडके, तुषार जीकार, धनंजय कापसे, चेतन पाटील इत्यादी शिक्षकांनी परीश्रम घेतले.

