सर्व पक्षीय नेत्यासह संघर्ष समिती यांनी खासदार अमर काळे यांना दिली माहिती, उपजिल्हा रुग्णालय लगत ४१ एकरमध्ये होणार मेडिकल कॉलेज. ४१ एकराचे संपूर्ण सातबारा महाराष्ट्र शासनाच्या नावे.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- १२ जुलै:- उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट लगत ४१ एकर असलेल्या जागेची खासदार अमर काळे पाहणी करण्याकरिता आले असता त्यावेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर व संघर्ष समिती शिष्ट मंडळ यांच्या वतीने जागे संबंधी त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली व निवेदनाद्वारे उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट लगतच ४१ एकर मध्ये मेडिकल कॉलेज बांधण्यात यावी अशी मागणी केली असता जनतेच्या मागणीनुसार उपजिल्हा रुग्णालय लागतच मेडिकल कॉलेज बांधण्यात येईल व लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वस्त केले.
उपजल्हिा रुग्णालय हिंगणघाटला लागुन असलेली पुरपीडीत ले-ऑउटची खाली शिल्लक असलेली जागा, म्हाडाची खाली असलेली जागा, नगर पालीकेच्या आरक्षित जागा, वॉल कपांऊडची बांधलेली ट्रॅक, क्रीडा संकुल, सांस्कृतिक भवन इत्यादी जागेचे आरक्षण रदद करून शासकीय मैडीकल कॉलेजसाठी खाली असलेली सर्व जागा आरक्षित करून मंजुरी देण्यात यावी असे आम्ही
सरकारला निवेदन देत आहो.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालया करीता राष्ट्रीय महामार्ग तथा पिंपळगाव रोड लगत लागत आवश्यक शासकीय जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी सदयपरिस्थित उपजिल्हा रुगणालय सुरु असुन सदर जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्ग खोल्या प्रयोगशाळा, वैदयकीय सुविधा वार्ड इत्यादी करीता पर्याप्त आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात पूर्व बाजुस लगतच आरक्षण क्र.६७ प्राथमिक शाळा व आरक्षण क्र.६८ हायस्कुल करीता १.७४ हेआर (४.३५ एकर जागा मोकळी असुन या जागेचे करिकोळ बदलाचा प्रस्ताव शासनाला केल्यास सदर जागा कर्मचारी मुलांचे व मुलीचे वसतिगृह या करीता उपयोगात आणता येईल.
सदर उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्गाला लागुन असल्यास मुळे या ठिकाणी मल्टीस्टोरेटज बिलडॉग सुध्दा बांधता येईल. उपजिल्हा रुग्णालय हे १६.८५ एकर जागेत आहे. त्यात 1 एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृहाला दिली आहे. सर्व्हे नं.१६९ मध्ये २.०२ हेक्टर म्हणजे ०५ एकर जागे मध्ये टप्याटप्याने मोकळ्या जागेत रेसिडेशिय क्वार्टर बांधले असुन पुर्ण जिर्ण झाले आहे. जिर्ण झालेल्या रेसिडेसिय क्वार्टर पाहल्यास ०५ एकर जागा मेडीकल कॉलेजच्या उभारणीसाठी उपयोगात येवु शकते. सर्व्हे नंबर १९१/२, १९०, १६७, १६६ ही जागा महाडाच्या जागेच्या लगत असुन सर्व्हे क्रं.१९० आरजी ०.८८ हेक्टर आर चा ताबा म्हाडाला देण्यात आला आहे. परंतू ति जागा आज रोजी खाली आहे. १९१/२ ची आरजी ०१ एकर १६६ ची आरजी ०४ एकर १६७ ची आरजी ०४ एकर आज रोजी खाली असुन सर्व्हे क्रं. १९० ला संलग्न आहे. सर्व्हे क्रं.१६६, १६७ याचा ताबा दिला महाडला असुन तो आज रोजी खाली आहे. सर्व्हे क्रं १६५ एकुण आराजी १० एकर असुन सदर सर्व्हे क्रं यापूर्वी म्हाडला ताबा देण्यात आला आहे. १० एकर जागे पैकी अंदाजे ०५ एकर जागेवर महाडाने बांधकाम केले असुन ०५ एकर जागेपैकी काही जागेवर तात्पुरते स्वरूपाचे अतिक्रमण दिसुन येत आहे. सर्व्हे नं १९४ पिंपळगाव रोडला लागून ०४ पावणे पाच एकर जागा खाली आहे. ही जागा न. पां. रिझव्हेंशन असुन खाली आहे. सर्व्हे नं. १९५ ला पुरपीडीत लोकाना ०२ एकर पैकी पट्टे दिले असून फक्त ०३ मकान बाल गेले आहे. ही जागा सरकार मोबदला देवून अपाल्या ताब्यात घेऊ शकते उर्वरीत जागा खाली आहे.
रीझर्वेशन के ६९ न १७७ या जागेवर ०.९८ हेक्टर
आर म्हणजे २.५० अडीच एकर जागा दवाखान्याला लागत आहे. इथे वॉलकैप बांधले असुन जागा सुरक्षित आहे. ही जागा शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या उपयोगात येवु शकते. डॉ. आंबेडकर होस्टल ला दिलेली जागा ही खाली पडुन असुन डॉ. सायंकार हॉस्पीटलच्या बाजुला ०८ एकर असुन ति जवळपास जागा ०८ एकर असून खाली आहे. आरक्षण क्रं ७० हे कलोडे भवनच्या समोर असुन नॅशनल हॉयवेला लागले आहे. ति जागा शासकीय मैडीकल कॉलेज साठी उपयोगी येवु शकते.
किडा संकुलाचे उदघाटन बि. सी. सी. ग्राउंड वर झाले असुन पक्की वॉल कंपाऊड आहे. त्या जागेवर किडा-संकुल बनवण्यात यावे सांस्कृतिक भवन साठी सव्हें न. १९४ ची ४.३० साडे चार एकर जागा मागितली आहे. त्यासाठी डॉ. आंबेडकर चौकातील जुन्या सरकारी दवाखान्याची जागा शहराच्या मध्यभागी असुन नगर परीषदच्या प्रशासकीय बिल्डिंगला लागून आहे. त्यामुळे पिंपळगाव रोडवर सांस्कृतिक सभागृह बांधणे योग्य होणार नाही.
त्याप्रमाणे भविष्यातील मेडीकल कॉलेजच्या एक्सटेशनसाठी पिंपळगाव रोडवर जागा रिझव्र्हेशन आहे तरी भविष्यात शासकीय मेडिकल कॉलेजसाठी लागणरी जागा उपलब्ध आहे. जागा शासकीय असल्याने लगेच सरकारला प्रस्ताव पाठवून मंजुरी होऊ शकते आणि लगेच काम सुरू करता येईल तसेच ही जागा शहराच्या मध्यभागी असल्याने नागरीकांच्या सोईची आहे. पिंपळगाव रोडवर सरकारची असलेली जागा असताना सुध्दा फक्त ०९ एकर जागा उपलब्ध असल्याचा दाखला उपविभागीय अधिकारी व तहसिलदार करतात हे बेजबाबदारी पणाचे लक्षणे आहे. असा आमचा आरोप आहे.
दबावाखाली उपजिल्हा रुग्णालय लगत शासकीय जागा असतांना खोटे दस्तावेज प्रकाशित करून शासनाची लक्तरे वेशिवर टांगण्याचा प्रकार सरु आहे. याची सरकारने दखल घ्यावी. महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत दि.०५ फेब्रुवारी २०२४ च्या जी.आर नुसार सुयोग्य जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सलग्नित रुग्णालय या प्रयोजनार्थ निःशुल्क हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तरी शासनाचे निर्देशाप्रमाणे उपजिल्हा रुग्णालया लगत वैद्यकीय मेडीकल कॉलजेला मंजुरी देण्यात यावी.
त्यावेळी निवेदन देतेवेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सतीश धोबे, सचिव सुरेंद्र टेंभुर्णी, रागिणी शेंडे, जगदीश वांदिले, दिपाली रंगारी, सीमा तिवारी, शितल तिवारी, सुजाता जांभुळकर, गीता मेश्राम, सुनिता तामगाडगे, सुजाता जीवनकर, गीता तळवेकर, अक्षदा जीवनकर, मीनाक्षी ढाकणे, चंदा येलेकर, सुनीता गुजरकर, संगीता कुडमते, शिला राजूरकर, कुसुम हजारे, नंदा बावणे,पंचफुला नेताम, मंगला थुटे, बेबी कोल्हे, मंदाकिनी ढाले, सिंधू चावरे, छाया जांभुळकर, सुलोचना भगत, सुरेंद्र बोरकर, सुनील हरबुडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.