आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या कुंटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढावे, त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाअधिक पिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे यांनी हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीला दिलेल्या भेटी प्रसंगी केल्या.
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अमरावतीचे अध्यक्ष ॲङ. हेलोंडे यांनी हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट देऊन समितीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमाची माहिती समितीचे सभापती ॲड सुधीर कोठारी यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी समितीचे सभापती हरिष वडतकर, संचालक उत्तमराव भोयर, संजय कातरे, ओमप्रकाश डालिया, प्रफुल बाडे, निर्मेश कोठारी, तेजस तडस, सचिव तुकाराम चांभारे, समुद्रपमर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिंमतराव चतुर, हिंगणघाटच्या सहाय्यक उपनिंबधक सुचिता गुघाणे इत्यादी उपस्थित होते.
कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत शेतक-यांसाठी राबविण्यात येत असलेले एक रुपयात भोजन, एक रुपया निवासाची सुविधा, शेतक-यांच्या शेतात जाण्यासाठी पांदन रस्ता तयार करण्यासाठी केवळ इंधन खर्च आकारुन मोफत जेसीपी सुविधा, गोदाम सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात असल्याबाबत उपक्रमाची श्री. हेलोंडे यांनी प्रशंसा केली. शेतक-यांचा कृषि माल बाजार समिती विक्री येत असतांना त्यांचा माल हमी भावाने खरेदी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचनाही यावेळी ॲड निलेश हेलोंडे यांनी दिल्या.
यावेळी श्री. हेलोंडे यांनी कृषि उपत्तन्न बाजार समितीतील राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची पाहणी करुन शेतक-यांना मिळत असलेल्या एक रुपयात भोजन उपक्रमाचा आस्वाद त्यांनी यावेळी घेतला.