Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशनला द्या, वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे खा. अमर काळे यांना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 13, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशनला द्या, वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे खा. अमर काळे यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट रेल्वे स्टेशन येथे एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा या करिता वर्धा-बल्लारशाह यात्री संघा कडुन खासदार अमर काळे याना निवेदन देऊन मागणी केली आहे. खासदार झाल्यानंतर अमर काळे यांचे हिंगनघाट येथे प्रथम आगमन झाले. त्यांची भेट घेऊन अध्यक्ष राजेश अ. कोचर यांनी त्यांचे स्वागत केले व निवेदन देण्यात आले.

वर्धा-बल्लारशाह यात्री संघाकडुन खा. अमर काळे यांना हिंगणघाट रेल्वे स्टेशन गाड्यांचा थांबा संबंधित चर्चा करून सविस्तर माहिती दिली. वर्धा-बल्लारशाह यात्री संघ यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षापासून हिंगनघाट रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा म्हणून भरपूर आंदोलने, चर्चा, बैठकी झाल्या परंतु हिंगनघाट रेल्वे स्टेशनला थांबा मिळत नसुन फक्त आश्वासन मिळतं आहे. कोविडच्या आधी हिंगनघाट रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्यांचा थांबा होता. परंतु कोविड परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही गाड्याचा थांबा सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी रेल्वे प्रशासनाने फक्त आश्वासने आणि सहानुभूती पत्र दिले परंतु गाड्यांचा थांबा सुरू केला नाही. त्यामुळे खासदारांनी मध्यस्थी करून लवकरच गाड्यांचा थांबा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी खासदार अमर काळे यांनी सांगितले लवकरच प्रलंबित रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत केले जातील व स्वतः रेल्वे मंत्र्यांसोबत व अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न लवकर मार्गी लावणार असे वर्धा-बल्लारशा संघाला खा. अमर काळे यांनी सांगितले. अमृत भारत योजनेंतर्गत स्थानकावर सुरू असलेली विकासकामे जलद गतीने करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या निवेदनात बल्लारशाह-मुंबई, बल्लारशाह-पुणे ट्रेन दररोज सुरू करावी, काजीपेट-पुणे ही एक्सप्रेस साप्ताहिक आहे तीला रोज सुरू करण्यात यावे, भुसावळ-वर्धा मेमो पॅसेंजर बल्लारशाह पर्यंत वाढवावी, नागपूर माजरी-आदिलाबाद पॅसेंजर सुरू करावी, अजनी-काजीपेट पॅसेंजर सुरू करावी आणि कोरबा, इंदौर, रायपूर, जोधपूर, हिसरा (बिकानेर), धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा अप आणि डाऊन रेल्वे थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशन वर देण्यात यावा, हिंगणघाट रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अश्या विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सचिव डि.के. गुरनुले, दिलीप बालपांडे, मो. शहजाद आदींची उपस्थिती होती.

Tags: एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशनला द्यावर्धा बल्लारशाहा यात्री संघवर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे खा. अमर काळे यांना निवेदनहिंगणघाट रेल्वे स्टेशन
Previous Post

हिंगणघाट पोलीसच्या 112 टीमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या कडून सन्मान.

Next Post

राज्य विधान परिषदेचे 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राज्य विधान परिषदेचे 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदार.

राज्य विधान परिषदेचे 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In