मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी आणि संशयित आरोपी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सुमित याला अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या युवका बरोबर या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते. आरोपी कडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली. तिने नकार दिल्यानं आरोपीने पोलीस महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला.
नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येते वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना ट्रेनिंग दिलं. त्याच महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे हा धक्कादायक प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत घडला.
नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीत रात्रभर सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशियत आरोपीने मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली. तक्रार देणारी महिला पोलीस कर्मचारी खाजगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत. बलात्कार आणि मारहाणीनंतर संशयित आरोपीने पीडित महिलेचे व्हिडिओ देखील काढले.