आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- संकल्प एक लाख वृक्ष उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड व बीज रोपण मोहीमेचा समारोप वृक्ष दिंडीच्या आयोजनातून सोमवार ता.१५ रोजी करण्यात आला. वृक्ष दिंडीच्या कार्यक्रमात गिरड येथील ६ शाळेतील हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. मगन संग्रहालय समिती व वनविभागाच्या वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. या वृक्ष दिंडीत विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष पालखी काढून दिंडीत सहभागी केली. तर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाविषयी संदेश देणारे फलक सर्वांचे आकर्षण ठरले होते.
गुरुकुल विद्या निकेतन येथून वृक्ष दिंडी काढण्यात आली. वृक्ष दिंडीचे संचालन विकास विद्यालयाच्या बँड पथकाने केले. यावेळी पोलीस स्टेशन, बुध्द विहार, शिवाजी चौक, झेंडा चौक, ग्रामपंचायत कार्यालय येथून वृक्ष दिंडी काढून गावातील व्यापारी संकुलन रस्त्याने मगन संग्रहालयात दखल झाली यावेळी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
संकल्प एक लाख वृक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुल विद्या निकेतनच्या अध्यक्षा सुषमा दुबे होत्या. तर जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका मायाताई चाफले, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत साबळे, विकास विद्यालयाचे शिक्षक उमेश वाणी, क्रीडा शिक्षक राजू कांबळे, समाजिक कार्यकर्त्या रेखाताई डरे, जेष्ठ समाजसेवक बबन दाभणे, मगन संग्रहालयाचे समन्वयक गजानन गारघाटे यांची उपस्थिती होती.
यावेळी वृक्ष पालखी आणि वृक्षाचे पूजन करून पर्यावरणीय जयघोष करण्यात आला. बीज रोपण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम एक जन चळवळ निर्माण होण्याच्या हेतूने मगन संग्रहालय समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. बीज रोपण, वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश घराघरापर्यंत पोहचेल. आणि विद्यार्थ्यात देखील पर्यावरणीय विचार रुजेल.असे मत कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना जेष्ठ सामाजिक बबन दाबणे यांनी बोलतांना व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांत पर्यावरणीय विषय रुजविण्यासाठी वृक्ष दिंडी सारखे उपक्रम नित्याने राबविण्याची गरज असल्याचे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुषमा दुबे यांनी व्यक्त केले.
यावेळी मिशन १० हजार वृक्ष लागवड जण मोहिमेत कार्यरत श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विष्णू ब्राम्हणवाडे, मंथन भांदककर, अथर्व शिवणकर, कृष्णा गुंडे, उन्नती पाणबुडे, शिवानी गिरडे, मनोज भांदककर यांना वृक्ष भेट देवून पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन विष्णू ब्राम्हणवाडे यांनी केले. तर शंकर भिसेकर यांनी आभार मानले. वृक्ष दिंडीच्या यशस्वितेकरिता मगन संग्रहालयाचे सुरेश शेलोरे, प्रमोद आस्कर, शीलास गणवीर, शंकर भिसेकर, पवन झाडे, सचिन उरकुडे, विकास विद्यालयाचे शिक्षक किशोर बारोवकर, शिक्षक श्री. धुळे, शिक्षक श्री. महाकाळे, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कदीर, विठ्ठल पिंजरकर, नीलिमा भुजाडे, सुनिता वैद्य, नीलिमा दाते यांच्यासह वृक्ष प्रेमी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
वृक्ष दिंडीत सहा शाळेचे हजारो विद्यार्थी सहभागी
गिरड येथील गुरुकुल विद्या निकेतन, विकास विद्यालय, शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील कन्या विद्यालय, विकास विद्यालय कनिष्ठ विद्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी होत वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला.
विद्यार्थ्यांनी आठ हजार सिड बॉलची केली निर्मिती
संकल्प १ लाख वृक्ष कार्यक्रमातर्गत शाळेत विद्यार्थ्यांची सिड बॉल कार्यशाळा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्वयंमस्फूर्तीने आठ हजार सिड बॉलची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना मगन संग्रहालय समितीच्या वतीने तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले होते. सदर सिड बॉल टेकडीवर रोहन करण्यात येणार आहे.
३५ हजार रोपांचे करण्यात आले रोपण.
संकल्प एक लाख वृक्ष अंतर्गत १० जुलै ते १५ जुलै २०२४ पर्यंत आर्वी, फरीदपुर, मोहगाव, तावी, शिवणफळ, उंदीरगाव, जोगीणगुंफा, पिपरी, पिंपळगाव या गावात वृक्ष लागवड आणि बीज रोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत शाळा परिसर, मशानभूमी, सरकारी कार्यालय, मंदिर परिसर ,झुडपी जंगल तसेच गावातील रस्त्यांनी तब्बल ३५ हजार रोपांचे रोपण करण्यात आले.