राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- गोवंडी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आई वडील आपल्या लहान मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून शिस्त लावतात. पण काही वेळेला आई वडील आपल्या मुलावर इतका अतिरेक करतो की त्या लहान मुलांचं बालपण त्या घटनेने हरपून जाते.
गोवंडी तेथे ऐका आईने आपल्याच पोटच्या पोरीला भयानक यातना देत अंगावर चटके दिले, ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिढीत चिमुकल्या मुलीचा इतकाच दोष होता की, मुलीने झोपेत गादी ओली केला म्हणून… त्या महिलेने तिच्या पोटच्या लेकीला मारलं आणि एक भांड गॅसवर तापवून त्याच्या सहाय्याने त्या मुलीच्या पाठीवर, मांड्यावर आणि प्रायव्हेट पार्टवरही चटके दिले. गोवंडीतील महिलच्या या निर्दयी कृत्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्रूर हल्ल्याच्या वेळी आरोपी महिलेचा पती, त्या मुलीचे सावत्र वडील कामावर गेले होते. चटके बसल्यावर मुलगी वेदनेने व्याकूळ होऊन जोरजोरात ओरडू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले पण आरोपी महिलेने शेजाऱ्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे आमचं कौटुंबिक प्रकरण आहे, तुम्ही यात ढवळाढवळ करू नका, असा इशाराही तिने दिला. अखेर शेजाऱ्यांनी आपत्कालीन 100 क्रमांकावर कॉल करून ही बाब पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली आणि आई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या सांगण्यांनुसार, ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली ती पीडित मुलीची शेजारी आहे. ही मुलगी गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात तिची आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. आरोपी महिलेला आधीच्या पतीपासून दोन मुली असून दुसऱ्या पतीपासून देखील दोन मुलं आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि त्यांनी पीडित मुलीला लगेच रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले. याप्रकरणी त्या आरोपी महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ११८ (१), ११५ (२) तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कलम ७५ अंतर्गत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

