अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन परिसरात रात्री पेट्रोलिंग करीत असताना, दोन इसम त्याचे ताब्यातील ज्युपिटर मोपेड ने महेश ज्ञानपीठ शाळेकडून अवैध दारु घेऊन तेलंगखेडी कडे दारू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात पंच व पोलीस कर्मचारी सह नाकेबंदी करण्यात आली.
या नाकेबंदी त पथकाला ज्युपिटर मोपेड वर दोन इसम येताना दिसले. त्यांना थांबवून मोपेड चालक नामें शंकर अरविंद ढोकपांडे वय 21 वर्ष व मागे बसलेला नामें तेजस दत्तूजी मेश्राम वय 24 वर्ष राहणार इंदिरानगर बंगाली कॅम्प चंद्रपूर हल्ली मुक्काम इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट यांचे ताब्यातून सात खरड्याच्या खोक्यात प्रीमियम नंबर वन कोकण देशी दारूच्या 700 शीशा किंमत 70 हजार रुपये, टीव्हीएस कंपनीची जुपिटर मोपेड 1 लाख रुपये असा एकूण जुमला किंमत 1 लाख 70 हजार रुपयाचा माल बिना पास परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने जप्त करण्यात आला. आणि हिंगणघाट ठाण्यात अपराध क्रमांक 921/2024 कलम 65 (अ) (ई), 77 (अ) दारूबंदी कायदा सहकलम 3 (1), 181, 130/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत व मनोज गभने, पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोउपनि भारत वर्मा, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राहुल साठे, पोशी आशिष नेवारे, पो.शि. विजय काळे, पोशी अमोल तिजारे यांनी केली.